शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी लावतो म्हणत पैसे उकळले; महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तिपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:25 IST

- तरुणाने महापालिकेमध्ये याबाबत चौकशी केली असता अशा प्रकारे कोणतीही भरती प्रक्रिया राबवली नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तरुणाने पोलिसात गुन्हा नोंदवला.

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिपाई पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणाकडून पैसे घेतले. त्यानंतर तरुणाला बनावट सही-शिक्क्याचे नियुक्तिपत्र आणि उमेदवारांच्या नावाचे परिपत्रक देऊन नोकरी लागल्याची खात्री पटवून दिली. तरुणाने महापालिकेमध्ये याबाबत चौकशी केली असता अशा प्रकारे कोणतीही भरती प्रक्रिया राबवली नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तरुणाने पोलिसात गुन्हा नोंदवला.

सूरज सुनील नांगरे (वय २६, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैष्णव कालिदास शेळके (२७) याच्या विरोधात शिपाई पदांसाठी भरती सुरू असल्याचे सांगून तरुणाची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल; महापालिकेच्या वतीनेही तक्रार फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. हा प्रकार १ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत महापालिकेमध्ये घडला.

महापालिकेने मागील काही महिन्यांमध्ये कोणतीही पदभरती केलेली नाही. वैष्णव शेळके आणि फिर्यादी सूरज हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वैष्णव याने सूरज यांना महापालिकेमध्ये शिपाई पदांसाठी भरती सुरू असल्याचे सांगून त्यांना महापालिकेमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. सूरज यांना खात्री पटावी यासाठी त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड अशी कागदपत्रेदेखील वैष्णव याने घेतली. सूरज यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी ६५०० रुपये घेतले.

सूरज यांना महापालिकेमध्ये नोकरी लागल्याचे सांगून त्यांना महापालिकेच्या नावाने सही-शिक्का असलेले बनावट नियुक्तिपत्र आणि उमेदवारांच्या नावाचे परिपत्रक तयार करून सूरज यांना पाठवले. त्यांना मासिक १६ हजार रुपये पगार तसेच १६ हजार रुपये महागाई भत्ता मिळणार असल्याचे सांगण्यात आले. नियुक्तिपत्रावर विभाग, कामावर रुजू होण्याची तारीख नमूद केली. सूरज यांच्यासह महापालिकेच्या वतीनेदेखील याप्रकरणी कारवाई करण्याचा अर्ज पोलिसांना दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Job Scam: Man Duped with Fake Municipal Appointment Letter

Web Summary : A man was cheated of money with the promise of a job in Pimpri-Chinchwad Municipal Corporation. He received a forged appointment letter. The fraud was discovered after verification, leading to a police complaint and municipal action.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी