उमेदवारीनंतर प्रचारासाठी केवळ ११ दिवस; इच्छुकांसह पक्षांची धावपळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:10 IST2025-12-17T14:09:59+5:302025-12-17T14:10:27+5:30

इच्छुक उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Election Only 11 days left for campaigning after nomination; Parties rush to elect aspirants | उमेदवारीनंतर प्रचारासाठी केवळ ११ दिवस; इच्छुकांसह पक्षांची धावपळ  

उमेदवारीनंतर प्रचारासाठी केवळ ११ दिवस; इच्छुकांसह पक्षांची धावपळ  

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचारासाठी उमेदवारांना केवळ ११ दिवसांचा अल्प कालावधी मिळणार आहे. एका प्रभागात तब्बल ४० ते ७५ हजार मतदारसंख्या असताना इतक्या कमी वेळेत मतदारांपर्यंत पोहोचणे हेच मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (दि.२३) सुरू होणार असून, त्याआधीच संभाव्य उमेदवारांनी तयारीला वेग दिला आहे. तिकीट मिळताच प्रचार सुरू करता यावा, यासाठी प्रभागनिहाय संपर्क यादी, बूथनिहाय कार्यकर्ते, गाठीभेटींचे नियोजन आणि प्रचार साहित्याची पूर्वतयारी केली जात आहे. विशेषतः कमी कालावधीत पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात येत आहे. 

उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला वेग

मोठ्या प्रभागात प्रत्यक्ष घराघरात पोहोचण्यासाठी वेळ अपुरा असल्याने प्रचाराच्या पद्धतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पदयात्रा, कोपरा सभा, छोट्या बैठका, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, मोबाइल प्रचार वाहनांद्वारे प्रचार यावर भर दिला जाणार आहे. अनेक पक्षांनी आधीच अनौपचारिक जनसंपर्क सुरू ठेवला असून, उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला पूर्ण ताकदीने सुरुवात करण्याची तयारी आहे. 

उमेदवारांची कसोटी

दरम्यान, कमी कालावधीत मतदारांशी थेट संवाद साधणे, स्थानिक प्रश्नांवर स्वत:ची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करणे ही मोठी कसोटी ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांची नाराजी, तिकीट वाटपातील गणिते आणि मर्यादित प्रचार कालावधी या सगळ्यांचा सामना करताना राजकीय पक्षांची रणनीती किती प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : पिंपरी चुनाव: उम्मीदवारों को प्रचार के लिए केवल 11 दिन

Web Summary : नामांकन के बाद प्रचार के लिए केवल 11 दिनों के साथ, पिंपरी चुनाव के उम्मीदवारों को मतदाताओं तक पहुंचने में कड़ी चुनौती का सामना करना पड़ रहा है। पार्टियां सीमित समय के बीच सोशल मीडिया, बैठकों और घर-घर प्रयासों का उपयोग करते हुए जुड़ने की होड़ में हैं।

Web Title : Pimpri Elections: Candidates Get Only 11 Days for Campaigning

Web Summary : With just 11 days for campaigning after nomination, Pimpri election candidates face a tough challenge reaching voters. Parties are rushing to connect, utilizing social media, meetings, and door-to-door efforts amid limited time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.