शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पिंपरी महापालिकेचे संकेतस्थळच नाही 'अपडेट' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 23:31 IST

बदली झालेल्या तसेच नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांची मिळेना माहिती

ठळक मुद्देमाहिती अद्ययावत करून पोलीस आयुक्तालय, पोलीस ठाणे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देणे आवश्यकसंबंधित विभागांकडून माहिती उपलब्ध होण्यात अडचणी

पिंपरी : बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी म्हणून शहराचा नावलाैकिक आहे. तसेच केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन्मान करण्यात आला आहे. महापालिकेचे संकेतस्थळ दिव्यांग व्यक्तींना वापरण्याच्या दृष्टीने सोयीचे केल्याने हा पुरस्कार प्रदान केला. मात्र महापालिकेच्या संकेतस्थळावर अद्ययावत माहिती नाही. त्यामुळे संबंधित विभागाचे कामकाज ढेपाळल्याचे दिसून येते.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डिसेंबरमध्ये क्षेत्रीय स्तरावरील तसेच इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी नवीन जबाबदारी स्वीकारून कामकाज नियमितपणे सुरू केले आहे. मात्र कोणत्या विभागात कोणाची बदली झाली आहे, त्यांचा संपर्क क्रमांक, त्यांची जबाबदारी याबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळणे दुरापास्त झाले आहे. संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संकेतस्थळ अद्ययावत करण्याची तसेच त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेच्या आयटी विभागाकडे आहे. संबंधित विभागाकडून वेळोवेळी संकेतस्थळामध्ये बदल केले जातात. तसेच त्यात सुधारणा करून युजर्स फ्रेंडली केले जाते. महापालिकेच्या विविध विभागांकडून माहिती संकलित करून संकेतस्थळावर ती माहिती अद्ययावत करण्याची जबाबदारीही आयटी विभागाचीच आहे. मात्र संबंधित विभागांकडून माहिती उपलब्ध होण्यात अडचणी येत असून समन्वयाचा अभाव दिसून येतो.

पोलीस आयुक्तालय झाले माहिती मात्र चाैक्यांचीचपिंपरी-चिंचवड शहरासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. तत्पूर्वी एका परिमंडळांतर्गत उपायुक्त दर्जाचा पोलीस अधिकाऱ्याकडे शहराची जबाबदारी होती. त्यावेळच्या पोलीस चाैक्यांचे संपर्क क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर संबंधित माहिती अद्ययावत करून पोलीस आयुक्तालय, पोलीस ठाणे यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ते शक्य नसल्यास चुकीचे संपर्क क्रमांक संकेतस्थळावरून हटविणे अपेक्षित आहे. मात्र आयटी विभाग याबाबत उदासीन आहे.  

बदली झालेल्या तसेच नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांची माहिती संबंधित विभागांकडे मागितली आहे. त्याबाबत त्यांना इ-मेलव्दारे दोन ते तीन वेळा संपर्क साधला आहे. तरीही त्यांच्याकडून माहिती उपलब्ध झालेली नाही. माहिती उपलब्ध झाल्यानंतर संकेतस्थळ अद्ययावत करण्यात येईल.- निळकंठ पोमण, प्रमुख, माहिती व तंत्रज्ञान विभाग, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे