शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील रस्ते सफाईची निविदा बेकायदेशीर, प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 21:07 IST

पिंपरी चिंचवड महापालिकेतील रस्ते साफ सफाई यांत्रिक पद्धतीने करण्यासाठीची निविदा प्रसिद्ध केली

ठळक मुद्देनिविदेवर सुनावणी : निविदाप्रक्रियेला भाजपाचा विरोधतांत्रिक मुल्यांकन समितीने केलेल्या कागदपत्रांच्या तांत्रिक तपासणीत काही ना काही त्रुटी

पिंपरी : यांत्रिक पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याचा आक्षेप सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी घेतला असून सक्षम समिती व सर्वसाधारण सभेची मान्यता असल्याचे खोटेपणाने भासवून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे, निविदा रद्द करावी, सक्षम समिती व महापालिकेच्या मान्यतेनंतर कायदेशीरपणे राबवावी, अशी मागणीही महापालिकेत झालेल्या सुनावणीत सावळे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील रस्ते साफ सफाई यांत्रिक पद्धतीने करण्यासाठीची निविदा प्रसिद्ध केली. या निविदेत सर्वपक्षीय अळीमिळी असल्याचे उघड झाल्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसेने टीका केली होती. या प्रक्रियेवर भाजपाच्या सावळे यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर यावर आज सुनावणी झाली. दुपारी एक ते चार या वेळेत ही सुनावणी झाली. त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी म्हणणे ऐकूण घेतले.  सावळे यांनी आपली बाजू मांडताना निविदा कशी बेकायदा आहे त्याचे पुराव्यासह दाखले दिले. काळ्या यादित टाकलेल्या ठेकेदारानेच दुसऱ्या नावाने निविदा भरली ते कागदपत्रातून दाखवून दिले. सीमा सावळे म्हणाल्या, रस्ते सफाईचा विषय सुमारे ७५० कोटींचा असल्याने व कामाचा कालावधी हा तब्बल ८ वर्ष इतका असताना हा विषय वारंवार आयत्या वेळी मांडून महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ अन्वये अपेक्षित असलेल्या पारदर्शकतेला हरताळ फासणारा ठरतो. तसेच आयत्या वेळी प्रस्ताव सादर झाल्याने काहीतरी लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आठ वर्षांसाठी ९७ कोटींचा मूळ प्रस्ताव होता. मात्र, सर्वसाधारण सभेनेही आरएफपीत बदल केला. नव्याने निविदा प्रक्रिया राबविली. बदललेल्या आरएफपीनुसार ७ वर्ष कालावधी व सरासरी वार्षिक १०६.३३कोटींचा प्रस्ताव नव्याने तयार केला. तांत्रिक मुल्यांकन समितीने केलेल्या कागदपत्रांच्या तांत्रिक तपासणीत काही ना काही त्रुटी आढळून आल्या आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMNSमनसे