शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
3
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
4
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
5
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
6
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
7
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
9
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
10
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
11
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
12
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
13
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
14
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
15
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
16
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
17
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
18
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
19
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

Pimpri chinchwad Breaking: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा तब्बल ७११२ कोटींचा अर्थसंकल्प 'स्थायी'पुढे सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 12:59 IST

मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. अर्थसंकल्पावर त्यांची छाप आहे .

पिंपरी : औद्योगिक नगरी म्हणून नावलौकिक असलेल्यापिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२१-२२या आर्थिक वर्षांचा मूळ ५ हजार ५८८ कोटी ७८ लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ७ हजार  ११२कोटी रुपयांचा अर्थसंकल्पआयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी स्थायी समितीला सादर केला.  सभापती संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, विकास ढाकणे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा ३१ वा अर्थसंकल्प आहे. तर, नवनिर्वाचित आयुक्त राजेश पाटील यांचा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाच्या अभ्यासाठी ही विशेष सभा २४ फेब्रुवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.  

मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. अर्थसंकल्पावर त्यांची छाप आहे. त्यांची शुक्रवारी (दि.12) पुण्यात नोंदणी महानिरीक्षकपदी बदली झाली. हर्डीकर प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीला सादर केला.

सभा तहकूब करण्याची नामुष्की...

महापालिका अर्थसंकल्पाचे गांभीर्य सत्ताधारी भाजपला नसल्याचे दिसून आले असून स्थायी समितीची सभा एक तासांनी पुढे ढकलली आहे. पुरेशी गणसंख्या उपस्थित नसल्याने सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2021-22 चा अर्थसंकल्प सादर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार होता. मात्र पाचच सदस्य उपस्थित असल्याने सभा कामकाज काही काळ तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर एक तासांनी आठ सदस्य आल्यानंतर सभा कामकाज सुरू झाले. 

महापालिका सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.  सभेला शिवसेना गटनेते राहुल कलाटे, भाजपच्या भामा फुगे आरती चोंधे, संतोष कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे पंकज भालेकर, पंकज भालेकर, राजेंद्र लांडगे उपस्थित होते.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBudgetअर्थसंकल्पshravan hardikarश्रावण हर्डिकरcommissionerआयुक्तBJPभाजपा