शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 5335 कोटींचा अर्थसंकल्प सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 12:27 IST

अर्थसंकल्पात आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा मूळ ३५०६  आणि जेएएनयुआरम योजनांसह ५२३५ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासनाने गुरूवारी स्थायी समितीपुढे सादर केला. शून्य तरतुदी, विकासकामांना प्राधान्य आणि आयुक्तांच्या नवीन संकल्पनांचा समावेश आहे.सभापती सीमा सावळे यांना दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. यावेळी मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि आयुक्तांनी अर्थसंकल्पाची प्रत स्थायी समितीस दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१७-१८ या वर्षांचा अर्थसंकल्प चार हजार सातशे कोटींचा होता, तर जेएनएनयूआरएम व केंद्र शासनाच्या इतर योजनांसह एकूण 5100 कोटींचा होता. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सभापती सावळे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर त्यावर चर्चा, बदल होऊन सर्वसाधारण सभेसमोर चर्चाही झाली होती. त्यानंतर विकासकामांच्या निविदा काढण्यास सुरुवात झाली होती. २० फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाने अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मांडणे बंधनकारक आहे. त्यामुळे गुरुवारी अर्थसंकल्प मांडून त्यानंतर स्थायी समिती, महासभेत चर्चा होऊन ३० मार्चपर्यंत अर्थसंकल्प अंतिम करण्यात येणार आहे.

वैशिष्ट्ये१) आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला जाणार.२) शून्य तरतुदी, टोकन रक्कम टाकणे हे लेखाशीर्ष गायब होणार आहे.३) अर्थसंकल्पाचा आकारही कमी होणार आहे. ४)  नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव.५) सुधारित खर्चाला आळा ६) पाणीपुरवठा विशेष निधी 23 कोटी ७) पीएमपीएमएलसाठी 165 कोटींची तरतूद ८) स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी 100 कोटींची तरतूद ९)पंतप्रधान आवास योजनेसाठी 92.45 कोटींची तरतूद१०) शहरी गरीबांसाठी 928.89 कोटींची तरतूद

आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्नअर्थसंकल्पात लेखाविभागाच्या वतीने आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बजेटची माहिती येईपर्यंत ज्या कामांचे आदेश निघाले आहेत. चालू वर्षांत किती निधी आहे, तेवढीच रक्कम अर्थसंकल्पात नमूद केली आहे. जेवढ्या रकमेचे काम आहे, तेवढ्याच रकमेची निविदा काढायची, त्यासाठी तेवढीच रक्कम अर्थसंकल्पात ठेवण्याचे बंधनकारक आहे. सध्या सुरू असलेल्या विकासकामांसाठी १०० टक्के तरतूद केली आहे. त्याला निधी दिला जाणार आहे. अर्थसंकल्प तयार होईपर्यंत, जेवढे कार्यारंभ आदेश दिले आहेत, त्यांची माहिती घेऊन त्यासाठी लागणाऱ्या रकमेची नोंद केली आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी जेवढी तरतूद करण्यात आली आहे. तेवढीच रक्कम उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Puneपुणे