VIDEO: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी सहल केंद्रात खड्ड्यातून उकळते पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 15:45 IST2017-12-13T13:51:05+5:302017-12-13T15:45:26+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहल केंद्रातील खड्ड्यामध्ये उकळते पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व भितीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र येथून विद्युतवाहत वायर गेल्याने हा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

VIDEO: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी सहल केंद्रात खड्ड्यातून उकळते पाणी!
पिंपरी चिंचवड : भोसरी येथील सहल केंद्रात कंपोस्ट खतासाठी खड्डा खणत असताना पाण्याची लाईन लिकेज झाली होती. या पाईप मधील पाणी एका छोट्याशा खड्यात गेल्यावर गरम होऊन उकळत होते. त्यामुळे या ठिकाणी परिसरातील अनेकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. हा खड्डा खोदला असता या ठिकाणी विद्युत केबल तुटलेल्या अवस्थेत आढळली आहे. या केबल मुळेच पाणी गरम होत असल्याची ही चर्चा होती. मात्र विद्युत विभागाने पाहणी केली असता ही केबल चार वर्षा पूर्वी बंद केली असल्याची माहिती लोकमतला विद्युत विभागाने दिली आहे. ही केबल बंद असल्याने या केबलचा व पाणी गरम होण्याचा काहीच संबंध नसल्याचे समोर आल्याने पाणी गरम का होत आहे. त्यामुळे हा प्रश्न अनुत्तरितच राहिला असल्याने गूढ वाढले आहे. महापालिकेच्या वतीने पाणी का उकळते आहे, या बाबत शोधमोहीम सुरू आहे.
याबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.