खोदकामात वीजवाहिनी तोडल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 03:21 PM2017-10-21T15:21:02+5:302017-10-21T15:55:48+5:30

दापोडी येथील खोदकामात ११ केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याप्रकरणी महावितरणकडून शनिवारी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Criminal complaint in Bhosari police station for breaking power board khukkam | खोदकामात वीजवाहिनी तोडल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार

खोदकामात वीजवाहिनी तोडल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार

Next
ठळक मुद्देगणेशनगरमध्ये ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खोदकामात महावितरणची ११ केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तोडली.याप्रकरणी महावितरणकडून भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे : दापोडी येथील खोदकामात ११ केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याप्रकरणी महावितरणकडून शनिवारी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दापोडी येथील गणेशनगरमध्ये गुरुवारी (दि. १९) ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुरु असलेल्या खोदकामात रात्री १०.१५ वाजता महावितरणची ११ केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे या वीजवाहिनीवरील सुमारे ३६ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. दापोडीचे सहायक अभियंता मंगेश सोनवणे व जनमित्रांनी तातडीने पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक उपाययोजना सुरु केली. २८ रोहित्रांवरील वीजग्राहकांचा वीजपुरवठा लगेचच सुरळीत केला. उर्वरित ८ रोहित्रांवरील सुमारे १२०० वीजग्राहकांना पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे तुटलेली वीजवाहिनी दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आले. वीजवाहिनीला दोन ठिकाणी जॉइंट दिल्यानंतर रात्री १२.१५ वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला.
गणेशनगरमधील या खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने दापोडी व गणेशनगरमधील सुमारे १२०० ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तास खंडित होता. तसेच महावितरणचेही सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी महावितरणकडून भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Criminal complaint in Bhosari police station for breaking power board khukkam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.