शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना १ कोटीचे 'विमा कवच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 23:30 IST

महापालिकेचे आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील कर्मचारी कोरोना विरोधातील लढ्यात योगदान देत आहेत

ठळक मुद्देमहापालिकेत एकूण साडेसात हजार कायम आणि कंत्राटी कामगार करतात कामविमा कवचाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि पीपीपी किट देण्यात याव्यात

पिंपरी : कोरोना (कोविड-१९)वर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्याचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.कोरोना विरोधातील लढ्यासाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले जाणार असून, एक कोटीचे विमा संरक्षण दिले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोविडसाठी काम करणाऱ्या महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर उषा ढोरे यांना केली होती. त्यानुसार याबाबत बैठक होऊन कोविडसाठी काम करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले आहे. महापालिकेत एकूण साडेसात हजार कायम आणि कंत्राटी कामगार काम करतात. त्यापैकी कोविडसाठी प्रत्यक्षपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचे लाभ देण्यात येणार आहे.महापालिकेचे आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील कर्मचारी कोरोना विरोधातील लढ्यात योगदान देत आहेत. विविध जबाबदारी पार पाडत असताना त्यांचा प्रत्यक्ष कोरोनाग्रस्त रुग्णांशी संपर्क येत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांना सुरक्षा कवच योजनेअंतर्गत कोरोना संसर्ग होऊन दिवंगत झाल्यास त्यांच्या वारसांना राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेअंतर्गत पन्नास लाख, महापालिका कामगार निधीतून पंचवीस लाख रुपयांचे अर्थसहाय्य व त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली. तसेच वारस नोकरी न घेतल्यास अतिरिक्त पंचवीस लाख रुपये देणार आहेत.

कोरोना विरोधातील लढ्यात महापालिकेचे कर्मचारी उतरले आहेत. त्यांना विमा संरक्षण देण्यासंदभार्तील आदेश आणि कार्यवाही करण्यात आली आहे.   महापालिकेच्यावतीने अतिरिक्त २५ लाख रुपये अथवा महापालिका सभा व महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनंतर विशेष बाब म्हणून कायदेशीर वारसास महापालिका सेवेत नियुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेची मुदत ३० मार्चपासून ९० दिवसांपर्यंत असणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार आयुक्त व कामगार कल्याण निधी समितीला दिले आहेत. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

महापालिका क्षेत्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोविडसाठी काम करणाऱ्या महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एक कोटीचे विमा कवच देण्यात यावे, तसेच ज्या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातात, त्या डॉक्टर, नर्स, परिचारिका, आरोग्य आणि वैद्यकीय विभागाचे कर्मचारी यांना विमा कवचाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि पीपीपी किट देण्यात याव्यात. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने केली होती. त्यानुसार महापालिकेने निर्णय घेतला आहे.- अंबर चिंचवडे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ................

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरHealthआरोग्यdoctorडॉक्टरEmployeeकर्मचारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस