शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाला पदवाटपात झुकते माप, पिंपरी मात्र दुय्यमच

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 4, 2026 16:08 IST

- अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत; दोन विधानसभेचे आमदार नावालाच, कारभार भोसरी आणि चिंचवडच्या हाती

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून पदवाटप करताना पिंपरी विधानसभा मतदारसंघाला अपेक्षित स्थान दिले जात नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील महत्त्वाची पदे चिंचवड व भोसरी मतदारसंघांना मिळाल्याने पिंपरीचा राजकीय प्रभाव कमी पडतो आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापौरपद भोसरी विधानसभा मतदारसंघाला दिले असून, सत्तारूढ पक्षनेतेपद चिंचवड मतदारसंघाकडे गेले आहे. अशातच उपमहापौरपदासाठी भाजपच्या शीतल शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते, मात्र त्यांनी अचानक नकार दिला. त्यानंतर नगरसेविका शर्मिला बाबर यांना अर्ज भरण्यास सांगितले गेले, या घाईत घेतलेल्या निर्णयामुळे पक्षातील समन्वयाचा अभाव आणि नाराजी दिसून आली आहे. याशिवाय, महापालिकेच्या आर्थिक व धोरणात्मक स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरही चिंचवड किंवा भोसरी मतदारसंघातील नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी पुन्हा महत्त्वाच्या पदवाटपातून बाजूला राहत असल्याचे चित्र दिसत आहेत.भाजपचे दोन आमदार असूनही...

पिंपरी मतदारसंघातले विधान परिषदेवर भाजपचे दोन आमदार असूनही त्याचा निर्णयप्रक्रियेत परिणाम स्पष्ट दिसत नाही. पिंपरीत भाजपचे चांगले नगरसेवक निवडून आले आहेत. तरीही सत्तेतील प्रतिनिधित्वात तो प्रभाव पडत नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी पक्षासाठी आव्हान ठरू शकते, त्यामुळे भाजपने संतुलित पदवाटप करण्याची मागणी जोर धरत आहे.

तीनही प्रमुख पदासाठी पिंपरीला ठेंगा...

आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आणि धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरही चिंचवड किंवा भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकालाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तसे झाले, तर महापालिकेच्या तीनही प्रमुख केंद्रबिंदूंमध्ये पिंपरी पुन्हा एकदा बाजूला पडल्याचे चित्र स्पष्ट होईल. 

रिपब्लिकन पक्षालाही डावलले...

पिंपरी-चिंचवड महापालिकेत महायुतीत सहभागी असूनही रिपब्लिकन पक्षाला डावलले जात असल्याची भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे शहराध्यक्ष व नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी व्यक्त केली आहे. महापौर व उपमहापौरपद न मिळाल्यानंतर आता स्थायी समिती सभापतिपद देऊन अन्याय दूर करावा, अशी त्यांनी मागणी केली. पुणे महापालिकेत भाजपने रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद देऊन युतीचा धर्म पाळला होता. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याने कार्यकर्ते व आंबेडकरी समाजात नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri sidelined in PCMC power-sharing; Chinchwad, Bhosari get priority.

Web Summary : Pimpri feels ignored in PCMC power distribution, with key posts going to Chinchwad and Bhosari. This sparks discontent among local BJP workers and allies, potentially impacting upcoming elections.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६