शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी - चिंचवडला मिळणार आणखी चार सहायक पोलीस आयुक्त; शहर पोलीस दलातील संख्या आता १२ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 14:33 IST

शासनाची मान्यता : बॉम्ब शोधक-नाशक पथकालाही मंजुरी

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत रावेत, शिरगाव, म्हाळुंगे (चाकण) या तीन पोलीस चौकींना पोलीस ठाण्यांचा दर्जा

पिंपरी : मनुष्यबळ उपलब्ध होण्याबाबत पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाकडून शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार शासनाकडून विविध पदांना मंजुरी देण्यात येत आहे. शहरात सध्या आठ सहायक पोलीस आयुक्त कार्यरत असून, आणखी चार पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहर पोलीस दलातील सहायक आयुक्तांची संख्या १२ होणार आहे. यासह शासनाने बॉम्ब शोधक-नाशक पथकालाही मंजुरी दिली आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत रावेत, शिरगाव, म्हाळुंगे (चाकण) या तीन पोलीस चौकींना पोलीस ठाण्यांचा दर्जा दिला होता. या तीनही चौक़्यांना पोलीस ठाणे म्हणून अंतीम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलीस ठाणे म्हणून कामकाज सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या ठाण्यांसाठी मनुष्यबळ देखील शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका पोलीस ठाण्याला सरासरी १२० याप्रमाणे तीन ठाण्यांसाठी ३६० पोलीस  उपलब्ध होणार आहेत. तसेच शहर पोलीस दलासाठी आणखी एक अपर आयुक्त आणि दोन उपायुक्त अशा तीन पदांना मंजुरी मिळाली. त्यामुळे शहर पोलीस दलात दोन अपर पोलीस आयुक्त तर पाच पोलीस उपायुक्त असणार आहेत.

बॉम्ब शोधक व नाशक पथक सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली. या पथकामध्ये सध्या दोन टीम २४ तास कार्यान्वित राहणार आहेत. प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी, स्फोटकाबाबतची माहिती देण्यासाठी अद्यावत साधन सामग्री आणि प्रशिक्षित श्‍वान पथक यांचा यात समावेश असणार आहे. सध्या पोलीस दलात असलेल्या आणि बॉम्ब शोधक नाशक पथकात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगामी काळात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBombsस्फोटके