शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पिंपरीत टोळक्यांचा धुमाकूळ ; वाहन तोडफोडीच्या घटनांनी शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 13:29 IST

पिंपरीत हुल्लडबाजी करून दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्यांकडून सातत्याने असे गुन्हे केले जात आहेत...

ठळक मुद्देहुल्लडबाजांकडून उपद्रव; 9 महिन्यांत 27 गुन्हे, 126 आरोपींना अटक

नारायण बडगुजर -पिंपरी : यंदा जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात वाहन तोडफोडीचे 27 गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी विविध गुन्ह्यांत 126 आरोपींना अटक केली आहे. असे असतानाही टोळक्यांकडून तोडफोडीचे सत्र सुरूच आहे.त्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हुल्लडबाजी करून दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्यांकडून सातत्याने असे गुन्हे केले जात आहेत.

पोलीस आयुक्तालय कार्यान्वित होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांसह वाहन तोडफोडीचे तसेच वाहने पेटविण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. 15 ऑगस्ट 2018 रोजी पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यानंतर या प्रकारांना आळा बसेल, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. मात्र, याप्रकारचे गुन्हे सातत्याने होत आहेत. वाहन तोडफोडीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि वाहनांची तोडफोड हे जणू समीकरण झाल्यासारखेच आहे. यातील कारण तेवढे बदलत राहते. किरकोळ कारणातून, जुन्या वादातून, दोन गटातील भांडणातून, वर्चस्वासाठी तर कधी दहशतीसाठी ही तोडफोड होत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.

100 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोडगेल्या आठवड्यात पिंपरीतील नेहरूनगर येथे किरकोळ कारणावरून 100 जणांच्या टोळक्याने धुडगूस घालून वाहनांची तोडफोड केली. रहाटणी येथेही टोळक्याने तोडफोड केल्याचा प्रकार घडला. एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे हे प्रकार घडत आहेत. अल्पवयीन मुलांचाही या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे दिसून येते. सातत्याने हे प्रकार होत असल्याने शहरवासीयामध्ये प्रचंड दहशत आहे. या हुल्लडबाज टोळक्यांचा शहरातील उपद्रव दिवसेदिवस वाढतच आहे.

कोयत्याचा होतोय सर्रास वापरबहुतांश गुन्ह्यांमध्ये टोळके हातात हत्यारे घेऊन आर डाओरडा करून हुल्लडबाजी करतात. तसेच काही जणांवर जीवघेणा हल्ला करतात. अशा गुन्ह्यांमध्ये तलवारीवकोयत्यांचा सर्रास वापर होत आहे. कोयत्याने वार करून तसेच कोयते हवेत फिखून दहशत निर्माण केली जाते.

........गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. आपापसातील भांडणातून तोडफोडीचे प्रकार होत आहेत, असे असले तरी यातील गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यापुढे असे गुन्हे करण्यास कोणीही धजावू नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.-आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीThiefचोरcommissionerआयुक्त