शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 18:59 IST

सहा जणांना बेड्या ठोकल्या, पोलिसांनी जप्त केल्या एक कोटी २० लाखांच्या १६ चारचाकी

ठळक मुद्देवाहन मालकांशी बोलून व्यवहार पूर्ण करून घेऊ, असे सांगून आरोपी वाहनांची विक्री करत होते

पिंपरी: चारचाकी वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवत त्याचा करार करून परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून एक कोटी २० लाख २० हजार रुपयांची १६ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. 

कल्पेश अनिल पंगेकर (वय ३३, रा. नवी खडकी, येरवडा), नमण सहाणी (वय ३९, रा. लोहगाव, पुणे), सनी भाऊसाहेब कांबळे (वय २७, रा. खडकी), संदीप ज्ञानेश्वर गुंजाळ (वय ३७), हितेश ईश्वर चंडालीया (वय २७), रोनित मधुकर कदम (वय २८, तिघेही रा. येरवडा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवून त्याबाबत करार करून आरोपी फसवणूक करत होते. याप्रकरणी सुनील नामदेव राखपसरे (रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात १९ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचवड पोलिसांनी तपास केला असता आरोपींनी १६ चारचाकी वाहने अशाच प्रकारे भाड्याने देण्याचे आमिष दाखवून करार करून मूळ मालकांची फसवणूक केली. तसेच ती वाहने परस्पर विक्री केली. 

सदरच्या वाहन मालकांशी बोलून व्यवहार पूर्ण करून घेऊ, असे सांगून आरोपी वाहनांची विक्री करत होते. आणि वाहन खरेदी करणाऱ्या लोकांना खोटी माहिती देऊन त्यांचीही फसवणूक करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.  चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे आणि त्यांच्या पथकाने  ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकcarकारbikeबाईक