शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

पिंपरी-चिंचवड डायरी, शह-काटशहाचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 1:26 AM

महापालिकेत सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. राष्टÑवादी, काँग्रेस, मनसे अशा अनेक पक्षांतून भाजपात दाखल झाल्याने

भारतीय जनता पक्षाचे अटल महासंमेलन पिंपरी-चिंचवड शहरात झाले. त्यानिमित्ताने शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातही भाजपाने आपली ताकत दाखवून दिली. दोन मतदारसंघांवर दावा केल्याने शिवसेनेला घाम फुटला आहे. त्यामुळे युतीचे गुºहाळ दोन्ही पक्षांना लवकर संपवावे लागणार आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपा आणि शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले. त्यातून कार्यकर्ते आणि हौसे-नवसे-गवसे यांचे लक्ष्मीदर्शनही होऊ लागले आहे.

महापालिकेत सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. राष्टÑवादी, काँग्रेस, मनसे अशा अनेक पक्षांतून भाजपात दाखल झाल्याने भाजपाची ताकत वाढली आहे. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे हे मोहरे भाजपात आल्याने महापालिकेत एकमुखी सत्ता आणण्यात यश आले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. आठ दिवसांपूर्वी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर अटल महासंमेलन झाले. त्यास मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, पिंपरी, मावळ, पनवेल, कर्जत, उरण या तालुक्यांतील, तसेच शिरूर लोकसभा मतदार संघातील भोसरी, हवेली, शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर भागातील कार्यकर्त्यांचीअलोट गर्दी होती. अर्थात भाजपाचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठीच हे संमेलन होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये.संमेलनाची गर्दी ही दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर दावा करण्यासाठी आली असल्याचे दिसून आले. त्यामध्ये दोन्ही जागांची मागणी आमदार जगताप आणि लांडगे यांनी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये जे पिकते त्याची हवा राज्यात निर्माण होते. भाजपाला सक्षम करण्यासाठी या दोन्ही जागा मिळाव्यात. दोन खासदार संसदेत पाठविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करतील, असे मत जगतापांनी व्यक्त केले. तर आमदार लांडगेंनी विरोधकांवर शरसंधान साधले. आम्ही भाजपा सोडणार, असा अपप्रचार केला जातो, याचे कारण आमचा धसका विरोधकांनी घेतला आहे. दोन्ही मतदारसंघ भाजपाला मिळायलाच हवेत, अशी मागणी लांडगे यांनी केली. ‘पैलवानाचा नाद करायचा नाय’ असा गर्भित इशाराही विरोधकांना दिला.वास्तविक भाजपाच्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते, मात्र ते सक्षमपणे झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी या जागांवर दावा करून ताकत देणे अपेक्षित होते. मात्र, राज्यातील युती सरकारमुळे त्यांनी उघडपणे मत व्यक्त करणे टाळले. मोदींचे हात बळकट करण्यासाठी समविचारी खासदारांना दिल्लीत पाठवू. तसे न झाल्यास व्यासपीठावरील दोघांचे हात बळकट करू, असे सूचक विधान केले. मुख्यमंत्र्यांचा रोख नक्की कोणाकडे होता हे कळलेच नाही. वास्तविकपणे दोघांचे म्हणजे नक्की कोणाचे, हेही स्पष्ट झाले नाही. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही, शिवेसनेच्या जागांवर दावा करण्यासाठी मेळावा नसून संघटनात्मक बांधणीसाठी आहे, असे स्पष्ट करून ‘अजित पवारांच्या दारात पोलीस उभे आहेत’ असे वादग्रस्त विधान करून सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे बिगुल या मेळाव्यातून फुंकले आहे. प्रमुख नेत्यांच्या भाषणावरून युतीबाबत सावध भूमिका भाजपा घेत असल्याचे दिसून आले. असे जरी असले, तरी या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपात चैतन्य निर्माण झाले आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे शिवसेनेला कंबर कसून काम करावे लागणार आहे. भाजपाने बूथनिहाय नियोजन केले आहे. खरे तर अटल संमेलन ही शिवसेनेसाठीधोक्याची घंटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मावळ आणि शिरूरचा शिवसेनेचा गड राखायचा असेल, तर युती होईल, नाही होईल, तोपर्यंत दोन्ही मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करणे गरजेचे आहे. युती न झाल्यास विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार श्रीरंग बारणे यांना भाजपाच्या मोठ्या आव्हानास सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीत जीभ पोळल्याने काँग्रेस, राष्टÑवादीलाही संघटनात्मक बांधणी करावी लागणार आहे अन्यथा बैल गेला नि झोपा केला, अशी गत होऊ शकते.या मेळाव्यानंतर आलेल्या दिवाळीत कार्यकर्त्यांची झालेली चांदी, भाजपा आणि राष्टÑवादीचे लक्ष्मीदर्शनही चर्चेचा विषय ठरला आहे. पक्षप्रतिमा, नीतीला तडा जाणार नाही, याची काळजी उभय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेणे गरजेचे आहे. अटल संमेलन शक्तिप्रदर्शनाचा भाग असला, तरी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला भाजपा हा सक्षम पर्याय निर्माण होऊ शकतो, याचे भान संबंधित नेत्यांनी ठेवायला हवे.भाजपाचे अटल महासंमेलन शहरात झाले. त्यानिमित्ताने शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातही भाजपाने आपली ताकत दाखवून दिली. दोन मतदारसंघांवर दावा केल्याने शिवसेनेला घाम फुटला आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपा आणि शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले.

- विश्वास मोरे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड