Pimpri Chinchwad Crime: बिअरच्या बाटलीने पत्नीवर वार; पतीला अटक, काळेवाडीतील घटना
By नारायण बडगुजर | Updated: April 9, 2024 15:07 IST2024-04-09T15:06:59+5:302024-04-09T15:07:19+5:30
काळेवाडी येथील आदर्शनगरमध्ये सोमवारी (दि. ८) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली....

Pimpri Chinchwad Crime: बिअरच्या बाटलीने पत्नीवर वार; पतीला अटक, काळेवाडीतील घटना
पिंपरी : कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीला मारहाण केली. तसेच बियरची बाटली फोडून वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पतीला अटक केली. काळेवाडी येथील आदर्शनगरमध्ये सोमवारी (दि. ८) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
अजय मधुकर दाणे (२६, रा. आदर्श नगर, काळेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. माधुरी अजय दाणे उर्फ माधुरी विष्णू पांचाळ (वय २५) यांनी याप्रकरणी वाकडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधुरी व त्यांचे पती अजय यांच्यात कौटुंबिक कारणावरून भांडण झाले. त्यावेळी अजयने शिवीगाळ करीत लाकडी बेलण्याने डोक्यात मारहाण केली. तसेच माुधरी यांना चावा घेऊन जखमी केले. खोलीत असलेली रिकामी बिअरची बाटली फोडून त्यांच्या तोंडावर, गळ्यावर वार केले. यात माधुरी गंभीर जखमी झाल्या.