शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राजाच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण पैसा वापराविना पडून

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 2, 2025 16:24 IST

- तब्बल ९०० कोटींची भांडवली रक्कम शिल्लक : तीन महिन्यांत उद्दिष्ट साध्य होणार का?

ज्ञानेश्वर भंडारेपिंपरी : महापालिकेच्या विकासकामांना प्रशासकीय राजवटीत माेठी खीळ बसली आहे. महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात भांडवली खर्चासाठी १ हजार ४२२ कोटी ३२ लाखांची तरतूद करण्यात आली असताना आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत फक्त ५२६ काेटी ६३ लाखांचा खर्च झाला आहे. तब्बल ८९५ कोटी २६ लाखांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांत ३०० काेटींची रक्कम खर्च करण्याचे स्थापत्य विभागापुढे उद्दिष्ट असणार आहे.महापालिकेच्या विविध काँक्रीट व डांबरी रस्ते, पूल, उड्डाणपूल, इमारत, शाळा, रुग्णालय, प्राणी संग्रहालय, क्रीडांगण, उद्यान, अर्बन स्ट्रीट डिझाईन, हरित सेतू, मस्त्यालय व इतर विकासकामे, योजना व प्रकल्पांसाठी मोठा भांडवली खर्च केला जातो. तो अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि महसुली खर्चानंतरचा सर्वाधिक मोठा खर्च असतो. निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश दिलेल्या कामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद केलेली असते.मागील वर्षापासून सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकात पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. अशा भांडवली खर्चासाठी २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात तब्बल १ हजार ४२२ कोटी ३२ लाख रकमेची तरतूद करण्यात आली होती. ती रक्कम वर्षभरात खर्च केली जाणे अपेक्षित आहे. मात्र, ९ महिने उलटले तरी स्थापत्य विभागाकडून फक्त ५२६ कोटी ६३ लाख रुपये खर्च झाले आहेत. हे प्रमाण ३७.०४ टक्के इतके अल्प आहे. अद्याप तब्बल ८९५ कोटी २६ लाखांचा निधी पडून आहे. ही रक्कम पुढील तीन महिन्यांत खर्च न झाल्यास शिल्लक राहणार आहे. त्यानंतर ती रक्कम इतर कामांकडे वळवली जाण्याची शक्यता आहे.अंदाजपत्रकातील तरतूद- भांडवली खर्च तरतूद - १ हजार ४२२ कोटी ३२ लाख- नऊ महिन्यांत खर्च - ५२६ कोटी ६३ लाख- शिल्लक निधी - ८९५ कोटी २६ लाख

लाेकसभा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांचा वेग मंदावला हाेता. स्थापत्य विभागाकडून शहरात वेगवेगळी कामे सुरू आहेत. त्या कामांच्या टप्प्यानुसार बिले काढली जातात. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत कामे पूर्ण करण्यावर अधिक भर दिला जातो. संबंधित ठेकेदार या महिन्यात मोठ्या प्रमाणात बिले सादर करतात. त्यामुळे ३१ मार्च २०२५ पर्यंत भांडवली खर्च अधिकाधिक खर्ची हाेईल. - मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाfundsनिधीMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवार