पिंपरी चिंचडवमध्ये बाईक-बसची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 13:44 IST2017-09-04T13:44:36+5:302017-09-04T13:44:42+5:30
पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपी बस व बाईकच्या झालेल्या धडकेत बाईकवरील दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. चांदणी चौकात पीएमपी बस व बाईक समोरासमोर धडक झाली व दुर्घटना घडली.

पिंपरी चिंचडवमध्ये बाईक-बसची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू
पिंपरी चिंचवड, दि. 4 - पीएमपी बस व बाईकच्या झालेल्या धडकेत बाईकवरील दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. चांदणी चौकात पीएमपी बस व बाईक समोरासमोर धडक झाली व दुर्घटना घडली. रविवारी (3 सप्टेंबर) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. मृत पावलेले व जखमी हे तिघेही बांधकाम व्यवसायातील मजूर असून ते बावधन येथे लेबर कॅम्पमध्ये राहत होते. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याने हे तिघं विरूद्ध दिशेने बाईकवरून चांदणी चौकात जात होते. या वेळी पुण्याकडे जाणारी निगडी कात्रज ही पीएमपी बस समोरून आली आणि बाईकला समोरासमोर धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पीएमपी बस चालक प्रकाश देवीदास राठोड (वय २९ रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.