पिंपरी : देहूगाव येथील इंडसइंड बँकेच्या एटीएममध्ये गॅस कटरच्या सहाय्याने दरोडा टाकणाऱ्या हरियाणातील टोळीतील दोन संशयितांना देहूरोड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मोटारीतून पळून गेलेल्या तीन साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री दोनच्या सुमारास घडली.हरियाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सीमा युसूफ खान (४०), वारीस खान (२०), आझाद खान (४५, सर्व रा. हरियाणा) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १.५०च्या दरम्यान देहू-आळंदी रोडवरील इंडसइंड बँकेच्या एटीएमजवळ थांबलेली पांढऱ्या रंगाची मोटार बीट मार्शल समाधान पटावकर व किरण पाटील यांना दिसली.
पोलिस आल्याचे पाहताच मोटार भरधाव वेगाने गेली. पोलिस एटीएमकडे धावले असता, एटीएमचे शटर उचकटलेले दिसले व आतून उजेड आणि आवाज येत असल्याने त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक जोएब शेख यांना तातडीने माहिती दिली. पोलिसांनी शटर उघडून आत प्रवेश केला असता, दोन संशयित गॅस कटरने एटीएम तोडण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांना पाहून संशयितांनी शिवीगाळ, दगडफेक केली.