पिंपरी: मावळातील तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कागदात लिंबु व त्याचेवर हळदी कुंकू टाकुन जादुटोणा केल्याचे उघड झाल्याने एका महिलेवर बुधवारी (दि ३१ जुलै) महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा केला आहे.तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास बळीराम गरुड ( वय ४९, रा शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली असून कमल पांडुरंग भेगडे (वय ६५, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीच्या आणि आरोपी हे शनिवारपेठेत जवळ-जवळ राहण्यास आहेत. गरुड हे पत्नी, १४ वर्षांचा मुलगा असे तिघे जण राहतात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणुन काम करीत आहेत.तळेगाव दाभाडे येथील मिळकतीवर अतिक्रमण आणि बेकायदेशिरपणे कुळ लावण्याचा प्रकार भेगडे कुटुंबाने केला आहे. त्या संदर्भात मावळ तहसिलदार यांच्याकडे दावा सुरु आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या माझ्या घरासमोर मारुती एसक्रॉस (एम.एच.१४ जी.वाय.३६२३) ही उभी करून घरात गेलो. जेवण करून करुन मी घरातच कुटुबियांसह गप्पा मारुन झोपी गेलो. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेसातला नेहमीप्रमाणे गाडी काढून लिंब फाटा येथे वॉकिंगसाठी गेलो. पुन्हा सकाळी साडेआठला घरी आलो.
त्यावेळी वडिलांनी सांगितले की, 'मी आपली गाडी लावल्या ठिकाणचा परिसर झाडुन काढत असताना, गाडी उभी केली होती. त्या जमीनीवर एका कागदात लिंबु, व्यास हळदी कुंकू लावलेले दिसले.' त्यावेळी मी वडिलांना सांगितले की, मी लिंबु वगैरे असे काही ठेवले नाही. मग, लिंबु व त्यास हळदी कुंकू लावून ते कोणी ठेवले असावे, याचा विचार घरीत सर्व करीत होतो. त्यावेळी पत्नी स्मिता हीने घरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावेळी रात्री दहा ते साडेदहाला एक महिला आली गाडीच्याखाली तिने हा सर्व प्रकार केला. पुढे ती महिला आम्ही सर्वांनी पहिली असता. संबंधित महिला कमल भेगडे यांनीच हा प्रकार केल्याचे उघड झाले, असे सुहास गरुड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधसाठी केलेल्या २०१३ च्या कायद्यानुसार तळेगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.