शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत बोअरवेलमध्ये लालसर पाणी अन् नदीत फेस; भाविकांत भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 14:15 IST

आळंदीमध्ये रासायनिक संकट; भूजलही धोक्यात ? प्रशासनाचे दावे हवेत

आळंदी : पवित्र तीर्थक्षेत्र आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून, हे तीर्थक्षेत्र प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून नदीचे पात्र पांढऱ्या शुभ्र रासायनिक फेसाने माखलेले असून, परिसरात पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, हे प्रदूषण आता जमिनीखालील जलस्रोतांपर्यंत पोहोचले असून, काही परिसरांतील बोअरवेलमधून लालसर आणि फेसाळ पाणी येऊ लागल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नदीकाठच्या गावांतून येणारे प्रक्रिया न केलेले मैलामिश्रित सांडपाणी आणि औद्योगिक पट्ट्यातून सोडले जाणारे घातक रासायनिक पाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीच्या परिसंस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यक्षम असल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येत आहे.

आळंदीतील अन्नपूर्णा मातानगर परिसरात काही नागरिकांच्या बोअरवेलमधून लालसर रंगाचे आणि उग्र वास असलेले फेसाळ पाणी येत असल्याचे समोर आले आहे. या पाण्याचा वास इंद्रायणीतील दूषित पाण्यासारखाच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे भूजल प्रदूषणाची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पर्यावरणप्रेमींचा संताप; कठोर कारवाईची मागणीइंद्रायणीच्या या दुरवस्थेमुळे वारकरी संप्रदाय आणि पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने केवळ पाहणी न करता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औद्योगिक आस्थापनांवर आणि सांडपाणी थेट नदीत सोडणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

त्वचाविकाराची भीती

इंद्रायणीच्या पवित्र जलात स्नान करण्यासाठी भाविक दुरून येतात. मात्र, सध्या नदीची झालेली अवस्था पाहून भाविक हताश झाले आहेत. रसायनांच्या फेसामुळे त्वचाविकारांची भीती आणि परिसरात पसरलेली दुर्गंधी यामुळे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे.

“नदीची आणि भूजलाची ही अवस्था पाहून भीती वाटत आहे. संबंधित विभागाने तातडीने या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून प्रदूषणाचे मूळ शोधून काढावे. अन्यथा आळंदीत साथीचे रोग पसरायला वेळ लागणार नाही.” -संजय घुंडरे, स्थानिक नागरिक

 “आम्ही माउलींच्या दर्शनासाठी येतो तेव्हा इंद्रायणीमध्ये स्नान करतो. पण आता नदीकडे बघवतही नाही. हे पाणी आहे की विष, असा प्रश्न पडतो. प्रशासनाने तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल.”  -विठ्ठल आबणे, वारकरी

English
हिंदी सारांश
Web Title : Alarms Raised as Aalandi's Water Sources Contaminated, Threatening Pilgrims

Web Summary : Aalandi's Indrayani River faces severe pollution, turning water reddish and foamy. Borewells are contaminated, causing public alarm. Untreated sewage and industrial waste pollute the river, harming the ecosystem and threatening pilgrims' health. Citizens demand strict action against polluters.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणी कपात