शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीतील वीज बिघाडाने लघुउद्योग संकटात; लघुउद्योजकांना आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:12 IST

दोन दिवसांच्या काळात एका प्लास्टिक उद्योगाला सरासरी दीड लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती संबंधित उद्योजकांनी दिली.

पिंपरी : भोसरी एमआयडीसी परिसरात शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. या लपंडावामुळे लघुउद्योजक पुरते हैराण झाले असून, त्यात सर्वाधिक नुकसान प्लास्टिक उद्योगांचे झाले आहे. दोन दिवसांच्या काळात एका प्लास्टिक उद्योगाला सरासरी दीड लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती संबंधित उद्योजकांनी दिली.

महावितरणकडून वेळोवेळी तात्पुरते उपाय केले जातात. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने वीज समस्येचे मूळ प्रश्न सुटत नाहीत, अशी तक्रार लघुउद्योजकांकडून करण्यात आली आहे.विशेषतः एमआयडीसीमधील टी-ब्लॉक, इंद्रायणीनगर येथील लांडगेनगर भागात शुक्रवारी सकाळपासूनच दिवसभरात तीन ते चारवेळा वीजपुरवठा खंडित झाला. दुसऱ्या दिवशी शनिवारीही सकाळपासून वीज गेली आणि दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत ती पुन्हा आलीच नाही. या काळात प्लास्टिक उद्योगांचे संपूर्ण शिफ्टचे उत्पादन ठप्प झाले. कामगारांना बसून पगार द्यावा लागला, त्यामुळे उद्योगांना आर्थिक फटका बसला.

या आठवड्यात टी-ब्लॉक भागात तीन ते चारवेळा वीजपुरवठा विस्कळीत झाला. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता वीज गायब झाली, तर शनिवारी दिवसभरात तीन ते चारवेळा वीज गेली. या सततच्या वीज खंडितमुळे उद्योजक आणि कामगार दोघांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

महावितरणकडे वीज दुरुस्ती वाहन उपलब्ध असले तरी ते वेळेत पोहोचत नाही किंवा उपयोगात येत नाही, अशीही तक्रार लघुउद्योजकांनी व्यक्त केली आहे. अशा अपुऱ्या सेवा आणि दुर्लक्षामुळे एमआयडीसीतील वीज समस्या अधिकच गंभीर होत चालल्या आहेत. 

सलग दोन दिवस विजेच्या लपंडावाने संपूर्ण शिफ्ट वाया गेल्याने कामगारांना बसून पगार द्यावा लागला. शिवाय उत्पादन ठप्प झाल्याने सरासरी दीड ते दोन लाखांचे नुकसान सहन करावे लागले. आता तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. -नितीन देवकर, श्री जय अंबे एंटरप्रायझेस, लांडगेनगर   

आमच्या कंपनीत मशिन टेस्टिंगचे काम केले जाते. त्यासाठी सलग वीज पुरवठा गरजेचा असतो. वीज पुरवठा खंडित झाल्यास पुन्हा पहिल्यापासून काम करावे लागते. या आठवड्यात तीन ते चार वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याने या कामात व्यत्यय आला. -वैभव जगताप, श्री साई एंटरप्रायझेस, टी ब्लाॅक, भोसरी एमआयडीसी 

महावितरणने वीज उपकेंद्रांकडे दुर्लक्ष करू चालणार नाही. जुनी यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा तात्काळ सुरू करणे गरजेचे आहे. वीज उपकेंद्रांमध्ये नवीन जीआयएस प्रणालीचा वापर केल्यास वीज समस्या कमी होतील. -संतोष सौंदणकर, माजी सदस्य, विद्युत संनियंत्रण समिती, पुणे 

भोसरी एमआयडीसी टी ब्लॉकमध्ये शुक्रवारी रात्रीपासून विजेचा खेळखंडोबा चालू आहे. रोजच्या विजेच्या लपंडावामुळे वेळेत उत्पादने देता येत नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्यांना नाहक दंडाचा भुर्दंड बसतो. तसेच कामगारांना बसून पगार देण्याची वेळ उद्योजकांवर येते. याची भरपाई महावितरण करणार का? -दुर्गा भोर, अध्यक्षाः पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योजक संघटना 

भोसरी येथील २२० केव्हीची अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील सीटी (करंट ट्रान्सफाॅर्मर) शुक्रवारी दुपारी चार वाजता फुटला. त्यामुळे ११ वीज वाहिन्या बंद पडल्या. त्यातील ८ वीज वाहिन्या १५ मिनिटांत सुरू झाल्या. तर तीन वाहिन्यांसाठी दीड तासाचा अवधी लागला. त्यामुळे टी ब्लाॅक आणि जे ब्लाॅकचा काही परिसर बाधित झाला होता. तर शनिवारी दोन पीन इन्सुलेटर फुटल्यानेही वीज पुरवठ्यावर परिणाम झाला होता. - अतुल देवकरः कार्यकारी अभियंता, महावितरण, भोसरी विभाग

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड