पिंपरी : महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील १५ हजारांहून अधिक पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयातील ४६२ पोलिस शिपाई पदांसाठी मैदानी (शारीरिक) चाचणीला बुधवारी (दि. ११) सुरुवात झाली. भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात ही चाचणी पार पडत आहे. पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांना बोलावले होते. मात्र, फक्त ५५१ उमेदवार हजर राहिले. यापैकी २२ उमेदवार अपात्र ठरले.
चाचणी प्रक्रिया कागदपत्र पडताळणीनंतर सुरू होते. त्यानंतर उंची आणि छाती मोजणी करण्यात आली. या टप्प्यात २७ उमेदवार अपात्र झाले. मात्र, अपील टेबलवर प्रथम अपीलमध्ये ५ उमेदवार पात्र ठरले. अपील टेबलवर सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी उपस्थित होते.
५० गुणांची मैदानी चाचणी
बुधवारी ५० गुणांच्या मैदानी चाचणीत १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक यांचा समावेश होता. प्रत्येक उमेदवाराच्या परीक्षेची व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. पारदर्शकता ठेवण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. एकूण ४६२ जागांसाठी १४,७७९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामुळे तीव्र स्पर्धा आहे. उद्यापासून (दि. १२) आणखी एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. मुलींच्या मैदानी चाचण्या शेवटच्या पाच दिवसांत पार पडणार आहेत, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी दिली.
उमेदवारांसाठी विशेष सोय
उमेदवारांच्या सोयीसाठी गवळी माथा येथील मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी आणि गाद्यांची सुविधा पोलिसांकडून पुरवली जात आहे. मैदानी चाचणीदरम्यान पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी सीसीटीव्ही, आरएफआयडी आणि बायोमेट्रिक्सचा वापर केला जात आहे.
Web Summary : Pimpri-Chinchwad police recruitment began with 551 candidates appearing. 22 were disqualified initially. The test includes running and shot put. Transparency is ensured with video recording and biometrics. Accommodation is provided.
Web Summary : पिंपरी-चिंचवड पुलिस भर्ती 551 उम्मीदवारों के साथ शुरू हुई। 22 शुरू में अयोग्य थे। परीक्षण में दौड़ और गोला फेंक शामिल हैं। वीडियो रिकॉर्डिंग और बायोमेट्रिक्स से पारदर्शिता सुनिश्चित की जाती है। आवास उपलब्ध कराया गया है।