शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad: आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील कूपनलिकेचे पाणी दूषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:10 IST

पाणी योग्य नसल्याचे तपासणी अहवालात आले समोर; १२ मार्चला झाली होती ३५ विद्यार्थ्यांना विषबाधा 

पिंपरी : मोशी प्राधिकरणातील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात कूपनलिकेचे (बोअरवेल) पाणी पिण्यायोग्य नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पाणी पिल्याने वसतिगृहातील ३५ विद्यार्थ्यांना १२ मार्च रोजी विषबाधा झाली होती. या घटनेनंतर प्रशासनाने येथील पाण्याचे नमुने महापालिकेच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. तपासणी अहवालात ही माहिती पुढे आली आहे.

२७० क्षमतेच्या वसतिगृहात परीक्षा झाल्याने सध्या १०० मुले राहतात. महापालिकेचा पाणीपुरवठा भूमिगत टाकीत होत असे. मात्र, वसतिगृह आवारातील कूपनलिकेचे पाणीही याच टाकीत सोडले जात होते. हे मिश्रित पाणी छतावरील टाकीतून फिल्टरमधून मुलांना पुरवले जात होते. त्यात फिल्टरही खराब असल्याने मुलांनी गृहपालांकडे पाण्याबाबत तक्रार केली होती, तरीही दुर्लक्ष झाले.

१२ मार्च रात्री अचानक ३५ विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आणि मळमळ झाली. त्यामुळे त्यांच्यावर नवीन भोसरी रुग्णालयात उपचार केले होते. या घटनेनंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वसतिगृहातील पाण्याचे नमुने तपासले. अहवालात कूपनलिकेचे पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांना बाहेरून जारमधून पाणी पुरवले जात होते. घटनेची दखल घेत आदिवासी विकास विभागाने गृहपाल राजकुमार राक यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. या घटनेनंतर भूमिगत टाकीची साफसफाई केली आहे. आता टाकीत फक्त महापालिकेचे पाणी साठवले जाते. फिल्टरची दुरुस्ती करून पुन्हा हे पाणी मुलांना दिले जात आहेत. 

महापालिका भूमिगत टाकीत पाणीपुरवठा करते. त्याच टाकीत कूपनलिकेचे पाणी सोडले जाते. महापालिका व कूपनलिकेच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता, कूपनलिकेचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले. - चेतन देवरे, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad: Tribal Hostel's Borewell Water Contaminated, Students Sick

Web Summary : Contaminated borewell water at a Pimpri-Chinchwad tribal hostel sickened 35 students. Tests confirmed the water was unsafe. The hostel's water system mixed municipal and borewell supplies, with a faulty filter. The official was suspended, the tank cleaned, and now only municipal water is used.
टॅग्स :PuneपुणेWaterपाणीpollutionप्रदूषणMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड