शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

मुक्या प्राण्यांचा अनन्वित छळ;पाच वर्षांत १५२ गुन्हे दाखल; श्वानप्रेमींकडून चिंता व्यक्त

By नारायण बडगुजर | Updated: August 16, 2025 18:14 IST

- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत भटक्या श्वानांवरील हल्ल्यांचे प्रकार सर्वाधिक : प्राण्यांना यातना; श्वानप्रेमींकडून चिंता व्यक्त; श्वानांची नसबंदी आणि दत्तक घेण्याबाबत जनजागृती नसल्याचा परिणाम

पिंपरी : माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र, काही जण अमानुष कृत्य करत या प्राण्यांना क्रूरतेची वागणूक देतात. त्यामुळे प्राण्यांना यातना सहन कराव्या लागतात. काही प्राण्यांना जीवाला मुकावे लागते. याप्रकरणी पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत १५२ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दिल्ली येथे भटक्या श्वानांसाठी उपाययोजना करण्यात याव्यात, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. त्यानंतर देशभरातील महानगरांमधील श्वानांसाठीही तशाच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातही काही जणांकडून या मागण्या मांडण्यात येत आहेत. याबाबत श्वानप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. भटक्या श्वानांना मारहाण केली जाते, त्यांच्या अंगावरून वाहने नेली जातात तसेच त्यांची हत्यादेखील केली जाते. याबाबत श्वान प्रेमींनी वेळोवेळी तक्रार केल्याने पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्यात आले.

महापालिका, राज्य शासनाचे दुर्लक्ष

भटक्या श्वानांचा उपद्रव कमी होण्यासाठी महापालिका आणि राज्य शासनाने वेळोवेळी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कोट्यवधींची तरतूद करून त्याचे ठेके महापालिकेकडून दिले जातात. त्यानंतरही श्वानांची नसबंदी केली जात नाही. तसेच श्वान दत्तक घेण्याबाबत जनजागृती केली जात नाही. त्यामुळे शहरात श्वानांची संख्या वाढत आहे.

चुकीची आकडेवारी

घरातील पाळीव प्राणी, मांजर, माकड किंवा श्वानदंश झाल्यानंतर रेबीजचे इंजेक्शन दिले जाते. महापालिका रुग्णालयांमध्ये प्राणीनिहाय याबाबत वर्गीकरण करण्यात येत नाही. त्यामुळे ही आकडेवारी श्वानदंशाचीच असल्याचे सांगितले जाते. ही बाब अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे भटक्या श्वानांबाबत चुकीची माहिती पसरवून प्रशासन त्यांची जबाबदारी ढकलत आहे. प्रशासनाने प्राणीनिहाय आकडेवारी द्यावी, तसेच प्रत्यक्षात भटक्या श्वानांची आकडेवारी स्वतंत्रपणे जाहीर करावी, अशी मागणी श्वानप्रेमींकडून होत आहे.

पोलिस ठाणेनिहाय दाखल गुन्हेप्राणी क्रूरता अधिनियम १९६० चा ११ (१) तसेच बीएनएस ३२५ (पूर्वीचा भारतीय दंड विधान कलम ४२८/४२१) अन्वये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत १५२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात पिंपरी पोलिस ठाण्यात १०४, संत तुकारामनगर ३, चिंचवड ६, भोसरी ३, सांगवी २, दापोडी ३, वाकड ७, काळेवाडी १, हिंजवडी १२, देहूरोड १०, रावेत ५, तळेगाव दाभाडे ३, शिरगाव ९, तळेगाव एमआयडीसी ४, चाकण ६२, दिघी ६, आळंदी ३, चिखली २, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ७ गुन्हे दाखल आहेत.

भटक्या श्वानांसाठी महापालिकेने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र, प्रशासन चुकीची माहिती देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करत आहे. भटक्या श्वानांवर हल्ले होतात. हे प्रकार थांबले पाहिजेत. जखमी, आजारी श्वानांवर उपचारासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.  -  कुणाल कामत, श्वानप्रेमी, सांगवी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे