शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र तस्करी करणाऱ्या तीन सराईतांच्या आवळल्या मुसक्या; दहशतीसाठी आणलेले पाच पिस्तूल, २० काडतुसे जप्त

By नारायण बडगुजर | Updated: June 1, 2025 18:13 IST

पिंपरी-चिंचवड मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी : पिस्तूल तस्करी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पाच पिस्तूल व २० जिवंत काडतुसांसह ८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ही कारवाई केली. 

उमेश चंद्रकांत केदारी (२८, रा. पुनावळे, ता. मुळशी), मंथन उर्फ गुड्डू अशोक सातकर (२८, रा. कान्हे, ता. मावळ), विशाल ज्योतीराम खानेकर (३०, रा. मोहितेवाडी, ता. मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून उमेश केदारी याच्याविरुध्द यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यासहीत चार गुन्हे दाखल आहेत. मंथन सातकर याच्याविरुध्द खुनाच्या प्रत्यत्नासह तीन गुन्हे दाखल आहेत. विशाल खानेकर याच्याविरुध्द शरीराविरुध्दचे दोन गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलिस अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर व विनोद वीर यांना माहिती मिळाली की, तीन संशयित तळेगाव दाभाडे परिसरात फिरत आहेत. तसेच त्यांच्या कारला नंबरप्लेट नसून ते पिस्तूल तस्करीसाठी आले आहेत. त्यानुसार पथकाने कारमधून फिरणाऱ्या तिघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पाच पिस्तूल व २० जिवंत काडतुसे मिळाली. त्यासह दोन मोकळ्या मॅग्जीन, तीन मोबाईल फोन व कार असा ८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार सोमनाथ मोरे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, हर्षद कदम, गणेश हिंगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

पोलिस कोठडीत रवानगी

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संशयितांनी हे पिस्तूल तस्करी तसेच दहशत माजविण्यासाठी आणल्याचे समोर आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत (४ जून) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक