शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

पालिकेच्या उद्याने, मोकळ्या जागांवर झुले, ट्रॅम्पोलिन लावण्यासाठी प्रतिबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:10 IST

- अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्णय : गोल चक्रे, फुग्यांची घरे, राइडससारखी मनोरंजनांची आणि खेळांची साधने लावण्यास बंदी, क्षेत्रीय कार्यालयांना दक्षता घेण्याचे निर्देश

पिंपरी : महापालिकेची मैदाने, उद्याने, मोकळ्या आणि आरक्षित जागांमध्ये झुले, गोल चक्रे, ट्रॅम्पोलिन, फुग्यांची घरे, विविध राइड्स अशी विविध प्रकारची मनोरंजनाची आणि खेळांची साधने लावण्यास परवानगी देऊ नये. या जागांवर अनधिकृतपणे खेळणी लावली जाणार नाहीत, याबाबत महापालिकेच्या सर्व संबंधित विभाग व क्षेत्रीय कार्यालयांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये नागरिक, संस्था यांच्यामार्फत विविध उत्सव, प्रदर्शने यांसाठी महापालिकेच्या मोकळ्या, आरक्षित जागा, मैदाने, उद्याने भाड्याने घेण्यात येतात. या ठिकाणी नागरिक, लहान मुले जास्तीत जास्त संख्येने यावीत, यासाठी तेथे झुले, गोल चक्रे, ट्रॅम्पोलिन, फुग्यांची घरे, विविध राइड्स अशा प्रकारची विविध मनोरंजनाची व खेळांची साधने लावली जातात. अनेकदा काही कार्यक्रमांमध्ये मनोरंजनाच्या खेळांची साधने तुटुन अपघात घडल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा अपघातांतून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

परवानगी न देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देशजीवाला धोकादायक, शरीराला इजा पोहोचविणाऱ्या खेळांच्या साहित्यवापरावर निर्बंध घालणे आवश्यक असून महापालिकेची मैदाने, उद्याने, मोकळ्या आणि आरक्षित जागांमध्ये अशी खेळणी उभारण्यास परवानगी देऊ नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या सर्व संबंधित विभाग व क्षेत्रीय कार्यालयांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.खेळणी अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाचीउद्यानांच्या परिसरांमध्ये मुलांच्या खेळण्यासाठी उभारण्यात येणारी फुग्यांची घरे, गोल चक्रे अशी खेळणी निकृष्ट दर्जाची आणि योग्य देखभाल दुरुस्ती नसल्याने लहान मुलांना शारीरिक इजा होण्याचा धोका संभवतो. खेळणी उभारणी करताना योग्य डिझाइनची करण्याबाबत विशेष काळजी घेतली जात नाही. शिवाय अशा खेळण्यांवर स्वच्छतेचा अभाव असतो. 

या समस्या निर्माण होत आहेत-झुले, गोल चक्रे, फुग्यांची घरे, आदी अने उपकरणे अपुरी देखभाल, निकृष्ट दर्जा किंवा अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांद्वारे चालवली जात यामुळे लहान मुलांना दुखापतींचा मोठा धोका संभवतो.-काही व्यक्ती मोकळ्या जागांमध्ये 3 परवानगीशिवाय मनोरंजनाची उपकरणे उभारून तिकीट आकारणी करतात; त्यामुळे सार्वजनिक जागेचा अनधिकृत आणि व्यावसायिक वापर होतो.-यांत्रिकी खेळण्यांची उभारणी करताना ३ अपघात होऊ नये यासाठी योग्य डिझाइ (स्ट्रक्चर) करण्याबाबत काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.खेळण्याच्या उपकरणांनी व्यापलेल्या जागेमुळे नागरिकांच्या चालण्याच्या, व्यायामाच्या, बसण्याच्या किंवा मैदानी खेळ खेळण्याच्या जागांवर मर्यादा येतात.-काही ठिकाणी झुले किंवा खेळणी रस्त्यालगत उभारली जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि अपघाताचा धोका वाढतो.स्वच्छतेची व निर्जंतुकीकरणाची व्यवस्थ 3 नसल्याने अशा उपकरणांचा वापर केल्य लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका असतो.-फुग्यांची घरे, स्पीकर लावून चालवले जाणारे खेळ, कर्णकर्कश संगीत यांमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होतो. त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड