शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
3
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
4
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
6
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
7
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
8
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
9
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
10
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
11
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
12
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
13
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
14
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
16
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
17
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
18
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
19
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
20
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

सत्तेत असून आंदोलनाची नौटंकी; हे तर वरातीमागून घोडे; दादांच्या महामोर्चावर साहेबांच्या गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 21:15 IST

तुम्ही कुठे गेले होते. हिंजवडी आयटी पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत, याला जबाबदार कोण? हे जनतेसाठी आंदोलन नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नौटंकी आहे.

पिंपरी : पिंपरी- चिंचवड प्रारूप विकास आरखडा प्रसिद्ध झाला. सूचना आणि हरकतींची वेळ संपली, आता राष्ट्रवादी दादा गटाचा महामोर्चा होणार आहे, सत्तेत असूनही आंदोलन करण्याची वेळ, लोकांनी समजायचे काय? वरातीमागून घोडे असा प्रकार आहे. निवडणुकीच्या तोंडावर नौटंकी आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे केली आहे. त्यास दादा गटानेही उत्तर दिले आहे. 

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रारूप विकास आराखडा १४ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर १४ जुलै ही सूचना आणि हरकतीसाठी शेवटची मुदत होती. त्यातच महापालिका निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. सूचना आणि हरकतीची मुदत संपली सुमारे ५० हजार हरकती आल्या आहेत. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने गुरुवारी महामोर्चाचे आयोजन केले आहे. पूररेषेचा घोटाळा, वाढीव आरक्षणे, गावठाणातील स्थानिक झालेला अन्याय, रिंग रोड अशा विविध विषयासाठी मोर्च्याचे आयोजन केले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) सोशल मीडियावर टीका केली आहे.शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, 'महापालिकेत १९९७ मध्ये विकास आराखडा तयार झाला. आपल्या कालखंडामध्ये किती आरक्षण विकसित झाली. ती का होऊ शकली नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्याचबरोबर विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर सूचना हरकतींसाठी असणारा कालखंड संपल्यानंतर आंदोलन घेणे म्हणजेच 'वरातीमागून घोडे' ही म्हण आंदोलनास लागू पडते. सर्वसामान्यांना फसवण्याचं, दिशाभूल करण्याचे काम दादा गट करीत आहे. सत्ता असूनही आज तुम्हाला न्याय मिळत नसेल तर अवघडच आहे की? अधिवेशनात विकास आराखड्यावर झालेल्या चर्चेत भाजपच्या आमदारांनी मते मांडली. पण राष्ट्रवादीने मत मांडलं नाही. भाजपने डीपी रद्द करण्याची मागणी केली. त्यावेळेस तुम्ही कुठे होतात. कुदळवाडी मध्ये अन्यायकारक कारवाई झाली.त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते. हिंजवडी आयटी पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत, याला जबाबदार कोण? हे जनतेसाठी आंदोलन नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नौटंकी आहे. भाजपचे आमदार आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीच डीपी केलेला आहे. त्यामुळे आंदोलनाचा दिखावा कशाला दाखवता. आराखड्यात स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय केला. कोणत्याही बिल्डरच्या जागांवर आरक्षणे पडलेले नाहीत.'

पिंपरी- चिंचवड महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये विकास आराखडा तयार केलेला आहे. तो अन्यायकारक आहे म्हणून आम्ही जनहितासाठी आंदोलन करत आहोत. त्यावर कुणाला टीका करायची असेल, हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रशासनाने कार्यालयात बसून हा आराखडा तयार केलेला आहे. तसेच कोणत्याही नागरिकांचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे विचारात घेतलेले नाही म्हणून या आराखडा विरोधात आमचे आंदोलन आहे- फजल शेख, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारPuneपुणेTrafficवाहतूक कोंडीhinjawadiहिंजवडी