पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातील तापमान आठवड्यात ४. २ अंश सेल्सियसने घटले आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटांसह शहरातील विविध भागात गुरुवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुपारी कामानिमित्त आणि खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या शहरवासीयांचे तारांबळ उडाली होती. गेल्या आठवड्याभरापासून दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. मागील आठवड्यात पारा ४० अंशावर पोहोचला होता. दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत आहे. तर पहाटेच्या वेळी गारवा जाणवत आहे.आठवड्यात तापमान सातत्याने घटले आहे. मंगळवारी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर बुधवारी काहीशी उघडीप दिली. गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र, तापमान कमी होते. दुपारी बारानंतर उकाडा वाढू लागला. सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास आभाळात ढग दाटून आले. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरू झाला. पाऊस यायला सुरुवात झाली. वारा नसल्याने शांतपणे पाऊस पडत होता. शहर परिसरातील भोसरी, चिंचवड, निगडी, दापोडी तळवडे, चिखली, मोशी, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी, ताथवडे अशा विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. सव्वाचार ते साडेपाच वाजेपर्यंत पाऊस सुरु होता. ढग दाटून आल्याने अंधार जाणवत होता. खरेदीला बाहेर पडले आणि अडकले, हवेत गारवा गुरुवारी औद्योगिक सुट्टी असते. त्यामुळे बहुतांश नागरिक कामगार वर्ग घरीच होता. खरेदी आणि फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पावसाने झोडपून काढले. त्यांची तारांबळ उडाली होती. शहरातील विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने सायंकाळी वातावरणात गारवा जाणवत होता. चिंचवडला आठवड्यात ४ अंशांनी तापमान घटले; दापोडीतील तापमान चिंचवडपेक्षा ५ अंशांनी घटले आहे. या आठवड्यातील कसे घटले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)वार, चिंचवड दापोडी शुक्रवार ३९. ४, ३७.३ शनिवार ३८, ३५. ९रविवार ३८. ३, ३६. ९ सोमवार ३८. ३, ३६. ६ मंगळवार ३८. ४, ३६. ६ बुधवार ३४. १, ३३. ८ गुरुवार ३५. २, ३४. १
ढगांच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस; चिंचवडला आठवड्यात ४ अंशांनी तापमान घटले
By विश्वास मोरे | Updated: April 3, 2025 17:34 IST