शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

जुलै उजाडला तरी ४० हजार विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:07 IST

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्य देण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा दावा यंदाही फोल ठरला आहे.

- गोविंद बर्गेपिंपरी : शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्य देण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा दावा यंदाही फोल ठरला आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही बुधवार (दि.२) पर्यंत केवळ २७ हजार ७०० विद्यार्थ्यांनाच साहित्याचे वाटप झाले आहे. अद्यापही ४० हजार ६५४ विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित आहेत. दरम्यान, वाटपाचा वेग वाढवून सर्वांना साहित्य देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २१७ बालवाड्या असून सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर ११० प्राथमिक शाळांमध्ये ४७ हजार ५९१ आणि २७ माध्यमिक शाळांमध्ये ९ हजार ७६३ असे एकूण ६४ हजार ३५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

गत वर्षापासून निविदा प्रक्रियेद्वारे पुरवठादारांकडून शालेय साहित्याची खरेदी केली जाते. त्यानंतर हे साहित्य थेट लाभ हस्तांतर पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. यामध्ये दप्तर, बूट, मोजे, खेळाचे बूट, कंपास पेटी, फूटपट्टी, रंगपेटी, वह्या, स्वाध्यायमाला, प्रात्यक्षिक पुस्तिका, चित्रकला वही, नकाशा पुस्तिका, रेनकोट, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली आदी साहित्याचा समावेश आहे.गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले नव्हते. यंदा पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र, १६ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर हा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. गेल्या १६ दिवसांत २३ हजार ७०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यातही सर्व साहित्य एकत्र मिळाले नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्याशाळेचा प्रकार : शाळांची संख्या, विद्यार्थी संख्याबालवाडी : २१७ -            ७,०००प्राथमिक शाळा : ११०- ४४,२८७माध्यमिक शाळा : २७ - ९,७६३एकूण : ३५४ - ६१,०५०एकूण : ३५४ शाळा- विद्यार्थी -६१०५०

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळा