शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad : सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी; कालचा ‘गोंधळ’ बरा होता....! 

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 25, 2026 16:44 IST

- सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांमधील विसंवाद चव्हाट्यावर, विरोधकांचा आक्रमक पवित्रा आणि प्रशासनावर जोरदार टीका; आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय टोलेबाजीवर अधिक वेळ खर्ची

पिंपरी : महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत मंगळवारी (दि.२४) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी रंगली. सभागृहात कामकाजापेक्षा आरोप-प्रत्यारोप, गोंधळ आणि राजकीय टोलेबाजी यालाच अधिक वेळ खर्ची पडल्याचे चित्र होते. त्यामुळे कालचा ‘गोंधळ’ बरा होता, असे म्हणण्याची वेळ आली.

सभा सकाळी ११:३० वाजता तहकूब झाल्यानंतर पुन्हा सुरू होताच नगरसेवक विनोद नढे यांनी सलग २५ ते ३० विषय मांडत तब्बल एक तास घेतला. सुरुवातीला महापौर रवी लांडगे यांनी त्यांना थोडक्यात मुद्दे मांडण्याचे आदेश दिले. मात्र, “सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी एक तास वेळ दिला आहे,” असे सांगत नढे यांनी महापौरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांतील विसंवाद उघड झाला.

विरोधक आक्रमक; उपमहापौरांना घेरावसभा सायंकाळी पाचपर्यंत चालली; मात्र या कालावधीत केवळ सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना बोलण्याची संधी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. माजी उपमहापौर शैलजा मोरे बोलण्यासाठी उभ्या राहताच शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनीही बोलण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना थांबविण्यात आले. यावर राष्ट्रवादीच्या संतप्त नगरसेवकांनी गोंधळ घालत उपमहापौर शर्मिला बाबर यांना घेराव घातला.

‘स्मार्ट सिटी’वर सत्ताधाऱ्यांचाच सवाल

मागीलवेळच्या सत्ताधारी भाजपचा महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प सभागृहात टीकेचा धनी ठरला. भाजपचेच नगरसेवक कुशाग्र कदम यांनी निविदा प्रक्रियेत अधिकाऱ्यांचा स्वार्थ असल्याचा आरोप करत, “एकही प्रकल्प पूर्ण नाही. हा स्मार्ट सिटी प्रकल्प की दळिद्री सिटी प्रकल्प?” असा संतप्त सवाल उपस्थित केला.

प्रशासकीय राजवटीवर घणाघातप्रशासकीय राजवट असताना तत्कालीन आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. अनेक चुकीची कामे करत या महापालिकेवर दायित्व टाकले. मोठमोठे पाप करून हे लोक कुंभमेळ्यात पाप धुण्यासाठी गेले. यांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हणत पुन्हा एकदा नगरसेवकांनी प्रशासकीय राजवटीवर निशाणा साधला. जांभळे-पाटील हे तर बिरबल

शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या की, येथे चार वर्ष शेखर सिंह नावाचे राजे होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे बिरबल प्रदीप जांभळे-पाटील होते. जसा राजा तशी प्रजा होती. आयुक्त डोळेझाक करत होते, खालचे अधिकारीही तसेच वागत होते. या काळात टेबलावर वजन ठेवल्याशिवाय कोणतीच फाईल हलत नव्हती. जांभळे-पाटील यांचा तर बांधकाम परवानगीचा ६६८ रुपये प्रति चौरस फूट दर ठरला होता. हे करून घेणारे वेगळे होते! त्यावेळेस येथे कोण येऊन मिटिंग घेत होते, याचे सीसीटीव्ही फुटेज तपासा.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad corporation meeting sees uproar; yesterday's chaos was better!

Web Summary : Pimpri-Chinchwad corporation meeting witnessed clashes between ruling and opposition parties. Accusations, political jibes dominated. Smart City project questioned. Administrative corruption under scrutiny. Officials implicated.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMunicipal Corporationनगर पालिका