शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रो प्रवाशांना खुशखबर..! पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर, स्वारगेट येथे नवीन प्रवेशद्वारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:32 IST

-पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट स्थानकांवर अतिरिक्त प्रवेशद्वारे

पुणे :पुणेमेट्रो प्रशासनाने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा व्हावा, या उद्देशाने शहरातील तीन महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त प्रवेशद्वारे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १४ रोजी पासून पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट मेट्रो स्थानकांवरील नवीन प्रवेशद्वारे प्रवाशांच्या सेवेसाठी खुली करण्यात येणार आहेत.

महामेट्रोकडून या तिन्ही स्थानकांवर भुयारी मार्गाच्या माध्यमातून प्रवेशद्वारांची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यास मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना वर्दळीचे मुख्य रस्ते ओलांडण्याची गरज कमी होणार असून, सुरक्षिततेत वाढ होईल. तसेच वेळ आणि श्रमाची बचत होणार आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक येथे प्रवेशद्वार क्रमांक ५ एसटी स्थानकाच्या बाजूला भुयारी मार्गाने सुरू करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे. यामुळे एसटी बसने येणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रोमध्ये प्रवेश मिळणार आहे. स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी आणि भरधाव वाहनांमधून रस्ता ओलांडण्याचा धोका टळणार असून, जेधे चौक परिसरातील ताण कमी होण्यास मदत होईल. 

शिवाजीनगर येथे शिमला ऑफिस चौकातून प्रवेश  

शिवाजीनगर मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक ३ आकाशवाणी केंद्राजवळील शिमला ऑफिस चौकात भुयारी मार्गाने सुरू होत आहे. गणेशखिंड रस्ता आणि कृषी महाविद्यालयाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना थेट स्थानकात पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे. या नव्या प्रवेशद्वारामुळे मुख्य रस्ता आणि मेट्रो स्थानक यांच्यात सुरक्षित व सुलभ जोडणी निर्माण झाली आहे. 

पिंपरी-चिंचवड मनपा स्थानकावर महामार्गालगत प्रवेश 

पिंपरी-चिंचवड मनपा मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक ३ पुणे-मुंबई महामार्गावर, पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर उघडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातून स्थानकात येणाऱ्या तसेच बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडण्याची आवश्यकता राहणार नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. 

मेट्रोची वाढती प्रवासी संख्या आणि त्यांच्या सोयी लक्षात घेऊन ही अतिरिक्त प्रवेशद्वारे सुरू करण्यात येत आहेत. मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास तसेच सुरक्षित प्रवासाला चालना देण्यास या उपक्रमाची मदत होईल.  -श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Metro Adds New Entry Points for Commuter Convenience

Web Summary : Pune Metro opens new entry points at Pimpri-Chinchwad, Shivajinagar, and Swargate stations on the 14th. These underground passages improve safety, reduce road crossings, and save time, benefiting commuters and easing traffic congestion near key areas.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMetroमेट्रो