शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणवाद्यांचे मत ऐकून मगच नदी सुधार प्रकल्प राबवा;शरद पवारांची महापालिकेस सूचना

By विश्वास मोरे | Updated: April 11, 2025 16:12 IST

पर्यावरण प्रेमींनी घेतली शरद पवार यांची भेट : मुळा नदी सुधारवर चर्चा  

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे  यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी - चिंचवड महापालिका प्रशासनाची हजेरी घेतली. 'शहरातील पर्यावरण प्रेमींची बाजू समजून घ्या आणि नंतरच नदी सुधार प्रकल्पाचे कामाचा विचार करा, अशी शब्दांत पवार यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना सूचना केल्या आहेत. शनिवारी तातडीची बैठक होणार आहे.  पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या सुधार प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले आहे. तर मुळा आणि मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या सुमारे ४ हजार ७००  कोटींचा प्रकल्प सुरु झाला आहे. पिंपरी -चिंचवड शहरातील सीमेवर प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे. त्यासाठी वृक्षतोड आणि नदीमध्ये भराव टाकण्याचे काम सुरु आहे.  मुळा नदीबाबत पर्यावरणवादी आणि नागरिकांना विचारात न घेता निविदा काढून घाईघाईत काम सुरू केले. शहरातील संस्था, संघटनांनी एकत्र येत या विषयावर आंदोलने सुरू केल्यावर प्रशासन हादरले. बोगस सर्वेक्षणही सुरु आहे. सांगवी येथे ठेकेदाराच्या कार्यालयात बैठक बोलावून अर्ज भरून घेण्याचा डाव पर्यावरणवाद्यांनी उधळून लावला होता. तब्बल ४० संघटनांचे कार्यकर्ते एक झाले असून मानवी साखळी, जनजागृती आंदोलन दर रविवारी सुरू झाले आहे. 

जेष्ठ पर्यावरण प्रेमी धनंजय शेडबाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, सिटीझन फोरमचे तुषार शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाबा भोईर, सागर चिंचवडे, कुस्तीगीर संघटनेचे संतोष माचुत्रे, पर्यावरणवादी  शुभम पांडे, सामाजिक कार्यकर्ते डॉमनिक लोबो, विजय पोटकुले उपस्थित होते.तुषार कामठे म्हणाले, 'शरद पवार यांनी तब्बल पाऊन तास सर्वांचे मत ऐकूण घेतले. शेखर सिंह हे मनमानी करतात आणि प्रकल्पाची मागणी नसताना तो लादत जात असल्याचे गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दूरध्वनी केला. पवार म्हणाले, 'पर्यावरण मित्रांचे मत का ऐकले जात नाही, परस्पर प्रकल्प कसे लादता, लोकांना विचारात घ्या.' त्यावर पुढच्या आठवड्यात वेळ द्यायचे आयुक्तांनी मान्य केले. महापालिकेत शनिवारी तातडीची बैठक होणार आहे.'

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रriverनदीmula muthaमुळा मुठाPuneपुणेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे