खंडाळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोरघाटात गुरुवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास भीषण साखळी अपघात घडला. या अपघातात एकामागोमाग आठ ते नऊ वाहनांची धडक होऊन गाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यानच व्हिडिओ चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकविरा देवीच्या चैत्री यात्रेमुळे लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली होती. यात्रा संपल्यानंतर भाविक परतीच्या प्रवासाला लागल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती.
Web Summary : A major pile-up involving nine vehicles occurred near Khandala on the Mumbai-Pune Expressway. The accident, caused by heavy traffic after the Ekvira Devi Yatra and a speeding truck, resulted in significant vehicle damage but thankfully no fatalities. Traffic was temporarily disrupted but quickly restored.
Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर खंडाला के पास नौ वाहन आपस में टकरा गए। एकविरा देवी यात्रा के बाद भारी ट्रैफिक और तेज रफ्तार ट्रक के कारण हुई दुर्घटना में वाहनों को नुकसान हुआ, लेकिन कोई हताहत नहीं हुआ। यातायात बाधित हुआ, पर जल्दी ही बहाल कर दिया गया।