शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पवना धरण परिसरातील अतिक्रमण हटाव कारवाईमुळे धरणग्रस्तांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 09:47 IST

- पुनर्वसन, पर्यायी जागा आणि हक्काचा मोबदला आधी का दिला जात नाही

पवनानगर : पवना धरण परिसरात जलसंपदा विभागाकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे धरणग्रस्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बंगल्यांवर, फार्महाऊसवर, हॉटेल्सवर आणि व्यावसायिक बांधकामांवर कारवाई सुरू असली, तरी धरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पूर्णपणे पुनर्वसन आणि मोबदला न मिळाल्याची नाराजी स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

आमचीच जागा अतिक्रमण म्हणून नोटिसा येत आहेत; पण आम्हाला पुनर्वसन, पर्यायी जागा आणि हक्काचा मोबदला आधी का दिला जात नाही?” असा सवाल धरणग्रस्तांमधून विचारला जात आहे. काहींचे लहान-मोठे व्यवसाय धरण परिसरातच असून, कारवाईमुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

“धरणासाठी जमीन दिली तेव्हा आमची काळजी घेतली जाईल असे सांगितले होते. पण, ६० वर्षांनंतरही योग्य मोबदला मिळालेला नाही. आता आमच्या व्यवसायालाच अतिक्रमण म्हणत नोटिसा देत आहेत. आधी आम्हाला जागा द्या, मग कारवाई करा.” -  बबनराव कालेकर – धरणग्रस्त शेतकरी 

“शेती गेल्यामुळे आम्ही हॉटेल व्यवसाय सुरू केला. तोही अतिक्रमणात मोडतो म्हणत कारवाई सुरू आहे. कोणतीही पर्यायी व्यवस्था न देता थेट हटाव करणे योग्य नाही.” - सुधीर घरदाळे – व्यावसायिक धरणग्रस्त शेतकरी

“आमच्या कुटुंबाचा संघर्ष सरकारला दिसत नाही. जमीन दिल्यानंतरही घर, जागा किंवा मोबदला मिळालेला नाही. कारवाई मात्र तातडीने सुरू आहे. आम्हाला न्याय हवा आहे.”  - अनिल राजिवडे धरणग्रस्त शेतकरी

“धरणग्रस्तांच्या झोपड्यांवर तत्काळ कारवाई होते; पण मोठ्या प्रकल्पांवर तितकीच गांभीर्याने दखल घेतली जात नाही. आमची एकच मागणी-पुनर्वसन आधी, कारवाई नंतर.”  नारायण बोडके अध्यक्ष, धरणग्रस्त कृती समिती “धरणासाठी जमीन दिल्यापासून आम्ही दशकांपासून न्यायाची वाट पाहतोय. योग्य पुनर्वसन किंवा मोबदला मिळालेला नाही. आता आमच्या उपजीविकेची साधी साधनंसुद्धा अतिक्रमण म्हणून सांगत आहेत. सरकारने आमचा हक्काचा प्रश्न आधी निकाली काढावा, मगच कारवाई करावी इतकीच आमची विनंती.” शाम रसाळ – धरणग्रस्त

पवना धरण परिसरातील अतिक्रमण हटाव कारवाई ही धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने अनिवार्य आहे. मात्र, धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या दुर्लक्षित राहू नयेत, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पुनर्वसन आणि मोबदल्यासंदर्भातील प्रक्रिया गतिमान करण्याबाबत कळविले असून, कोणत्याही कुटुंबावर अन्याय होणार नाही, याची प्रशासन कटाक्षाने काळजी घेईल. - माणिक शिंदे, उपअभियंता पवना उपविभाग 

स्थानिकांचा सवाल

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दशकांत धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर फार्महाऊस, रिसॉर्ट्स आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले गेले. अनेक बांधकामे नियमबाह्य असल्याचे आरोप आहेत; मात्र कारवाईचा फोकस मोठ्या प्रकल्पांपेक्षा धरणग्रस्तांच्या छोट्या बांधकामांवर दिसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pavna Dam Eviction Drive Sparks Fear Among Displaced People

Web Summary : Eviction drive near Pavna Dam creates fear among displaced villagers awaiting rehabilitation and compensation. Locals question why action targets them before resettlement, impacting livelihoods. Officials assure fair process, prioritizing dam safety while addressing grievances.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे