शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

निळ्या पूररेषेतील जमिनींचे व्यवहार करू नका;महापालिकेचे दुय्यम निबंधक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:41 IST

महापालिका हद्दीतून जाणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत असलेल्या जमिनींचे कोणतेही व्यवहार करू नयेत

पिंपरी : निळ्या पूररेषेतील जमिनींच्या अनधिकृत खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीतून जाणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत असलेल्या जमिनींचे कोणतेही व्यवहार करू नयेत, असे पत्र महापालिकेने राज्य मुद्रांक आणि नोंदणी विभागास, तसेच सह-दुय्यम निबंधक विभागास पाठवले आहे.महापालिकेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, निळ्या पूररेषेत येणाऱ्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, दस्तऐवजांची नोंदणी व हस्तांतरण थांबवावेत. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांच्या निळ्या पूररेषेत जमिनींच्या अनधिकृत व्यवहारांमुळे अतिक्रमण वाढत आहे. अशा जमिनींच्या व्यवहारांवर बंदी आली तर अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणास आळा बसेल, अशी महापालिकेची अपेक्षा आहे. याशिवाय, पालिकेने इंद्रायणी आणि पवना नदीच्या पूररेषेत असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवरही लक्ष केंद्रित केले आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी असल्याचे निदर्शनास आले असून, मागील काही महिन्यांत महापालिका कारवाई करत अनेक बांधकामे तोडली आहेत.

अनधिकृतपणे जमिनींचे व्यवहार होत आहेत. यामुळे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचेही प्रमाण वाढत आहे. या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार थांबले तर अनधिकृत बांधकामांना आळा बसेल. यामुळे अशा जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, यासाठी महापालिकेने सहदुय्यम निबंधकांना पत्र दिले आहे.  - अतुल पाटील, सहायक आयुक्त, महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid land deals in blue flood line: Corporation to registrars.

Web Summary : Pimpri-Chinchwad Municipal Corporation bans land transactions in the blue flood line of rivers. The move aims to curb unauthorized construction and encroachments along Pavana, Mula, and Indrayani rivers. The corporation has urged registrars to halt such transactions, hoping to control illegal constructions.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड