पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महिला आरटीओ अधिकारी आणि कॅबचालक यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.नाशिक फाट्याहून निगडीच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कॅबचालकाने महिला आरटीओ अधिकाऱ्यांच्या वाहनाला अप्पर-डिप्पर दाखवला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद चिघळल्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी संबंधित चालकाला गाडी आडवी घालून थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा व्हिडीओतून करण्यात आला आहे.
दरम्यान, कॅबचालकाने मोबाइलवर या घटनेचे चित्रीकरण करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यामुळे नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी अधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर काहींनी चालकाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
यासंदर्भात महिला अधिकाऱ्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, घटनेचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस स्थानकात संबंधित कॅबचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, दोन्ही बाजूंची सखोल चौकशी केली जात आहे. घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
Web Summary : A video of a dispute between a female RTO officer and a cab driver on the Pune-Mumbai highway has gone viral. A molestation case has been registered against the driver, with police investigating the incident.
Web Summary : पुणे-मुंबई राजमार्ग पर एक महिला आरटीओ अधिकारी और एक कैब चालक के बीच विवाद का एक वीडियो वायरल हो गया है। ड्राइवर के खिलाफ छेड़छाड़ का मामला दर्ज किया गया है, पुलिस मामले की जांच कर रही है।