पिंपरी : एका इमारतीवरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. ५ फेब्रुवारी) भोसरी येथे धावडे वस्तीत घडली. दरम्यान, तरुणाकडे चिठ्ठी सापडली आहे. पत्नी बेपत्ता असून तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय असून याबाबत त्याला पोलिसांनी मदत केली नसल्याचा आरोप चिठ्ठीतून करण्यात आला आहे.
केशरी प्रसाद साहू (रा. भोसरी, पुणे. मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साहू हा धावडे वस्ती भोसरी येथील एका इमारतीवर चढला. तो इमारतीवरून उडी मारण्याच्या तयारीत होता. स्थानिकांनी हा प्रकार पाहिला आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या पत्नीसोबत बोलण्याची मागणी केली. त्यानुसार त्याचे त्याच्या पत्नीसोबत बोलणे करून देण्यात आले. त्यानंतर त्याने अचानक इमारतीवरून खाली उडी मारली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
साहू याच्याकडे चार पानांची चिठ्ठी सापडली आहे. साहू याची पत्नी बेपत्ता असून तिला फूस लावून पळवून नेल्याचा त्याला संशय होता. संशयित व्यक्तींकडे चौकशी करावी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत आणि पत्नीला शोधून आणावे, अशी तक्रार त्याने पोलिसांकडे केली. मात्र त्याला पोलिसांची पुरेशी मदत मिळाली नसल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. माझी बायको कुठेही राहू शकत नाही. तिला माझ्याकडे परत आणा. ती परत येईल. बायको माझ्यासोबत नाही राहिली तर मुलीसाठी मी जगेन. माझ्या मृत्यूनंतर मला दफन करा. अग्निसंस्कार केले तर मुलीच्या हस्ते करा. पत्नी जिथे आहे तिथे जास्त दिवस राहणार नाही. तिला गावी सोडा, असेही चिठ्ठीत नमूद केले आहे.
व्हिडिओ व्हायरल
साहू इमारतीवर चढल्यावर परिसरात मोठी गर्दी झाली होती. काही जणांनी मोबाइलमध्ये याचे व्हिडिओ केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच साहू याने लिहिलेली चार पानी ‘सुसाइड नोट’ देखील पोलिसांना मिळाली आहे.
Web Summary : Pimpri: Kesari Sahu died by suicide, jumping from a building. A note revealed his wife was missing and he suspected foul play. Sahu accused the police of not helping him find her, expressing his despair and love for his daughter.
Web Summary : पिंपरी: केसरी साहू ने इमारत से कूदकर आत्महत्या कर ली। एक नोट में खुलासा हुआ कि उसकी पत्नी लापता थी और उसे गड़बड़ी का संदेह था। साहू ने पुलिस पर उसे ढूंढने में मदद नहीं करने का आरोप लगाया, अपनी निराशा और बेटी के लिए प्यार व्यक्त किया।