शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

दोघा विवाहीतांचं जुळलं..! सोबत राहण्याचा हट्ट करताच प्रेयसीचा ‘असा’ काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 17:41 IST

- वाकड येथील कॅब चालक विवाहित प्रियकराकडून पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

पिंपरी :प्रेमसंबंधांबाबत कुटंबीयाना माहिती झाल्यानंतर विवाहित प्रेयसीने विवाहित प्रियकराच्या सोबत राहण्याचा हट्ट धरला. त्यामुळे त्याने तिचा गळा दाबून आणि डोक्यात लोखंडी पाइपने मारून खून केला. त्यानंतर मृतदेह पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तरुणाला अटक केली.

राणी विशाल गायकवाड (२६, रा. सम्राट चौक, वाकड) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी अनिकेत महादेव कांबळे (३३, रा. गणेशनगर, थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी राणी गायकवाड घरातून बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी वाकड पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख यांच्या तपास पथकाने तातडीने तिच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. यात राणी गायकवाड सतत अनिकेत कांबळे याच्या संपर्कात असल्याचे समोर झाले. संशयित अनिकेत हा बार्शी–लातूर भागात गेल्याचे समोर आले. त्यानंतर वाकड पोलिसांनी अनिकेतला ताब्यात घेतले. पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख, श्रीनिवास दराडे, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, सहायक फौजदार संदीप गवारी, पोलिस अंमलदार वंदु गिरे, कौतेंय खराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सोबत राहण्याचा हट्ट केला अन्...

राणी आणि अनिकेत यांच्यात प्रेमसंबंध होते. राणी विवाहित असून तिला मुले आहेत. कुटुंबीयाना या संबंधांची माहिती झाल्याने तिने पती व मुलांना सोडून अनिकेतसोबत राहण्याचा हट्ट धरला. कॅबचालक असलेला अनिकेत देखील विवाहित असून त्यालाही मुले आहेत. त्यामुळे तो राणीला सोबत ठेवण्यास तयार नव्हता. मात्र, राणीने सोबत राहण्याचा हट्ट धरला. त्यामुळे राणीचा काटा काढण्यासाठी त्याने ‘प्लॅन’ केला. अनिकेतने बुधवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी राणीला “गावी नेऊन ठेवतो” असे सांगत कारमध्ये बसवून शहरात फिरवले. तिच्यासाठी नवीन कपडे खरेदी केले.पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

अनिकेत आणि राणी कारमधून धाराशिव जिल्ह्यातील बार्शी-लातूर रस्त्यावरील ढोकी गावाजवळ पोहचले. त्यावेळी अनिकेतने गळा आवळून लोखंडी पाईपने डोक्यावर वार करून राणीचा खून केला. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. त्यानंतर अनिकेत वाकड येथे आला.

खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

राणी बेपत्ता झाल्याबाबत तपास करताना वाकड पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी अनिकेत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान, २७ नोव्हेंबरला सकाळी ढोकी गावाजवळ अनोळखी मृतदेह आढळल्याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती मिळाली. खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Married Affair Turns Deadly: Woman Killed for Insisting on Relationship.

Web Summary : A married woman was murdered by her married lover after she insisted on living with him. The man strangled her, hit her with a pipe, and tried to burn the body. Police arrested the accused.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी