पिंपरी : काळेवाडी परिसरात एका तरुणाने रिक्षाचालकाच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली व पोलिसांना बोलावल्याचे सांगितल्याने संतापून त्याच्यावर ब्लेडने वार केले. तसेच कोयता काढून दहशत निर्माण केली. ही घटना ७ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गणराज कॉलनी, आदर्शनगर, काळेवाडी येथे घडली.
प्रेम ऊर्फ सोन्या बालाजी पोतदार (वय २३, रा. सांगवी) यास अटक केली. मधुकर विष्णू तमाके (५६, रा. काळेवाडी) यांनी मंगळवारी (दि. ८) याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरासमोर संशयिताने शिवीगाळ केली. पोलिसांना बोलावतो, असे सांगताच त्याने ब्लेडने फिर्यादीच्या डाव्या हनुवटीवर व कपाळावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर दुचाकीवर लावलेला कोयता काढून हवेत फिरवत “मी इथला भाई आहे, तुम्हाला जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी दिली.