पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी पिंपरी चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर पिंपरीत वाहतूक बदल करण्यात आला असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. शनिवारी (दि. ६ डिसेंबर) दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत वाहतुकीत बदल केला आहे. ..हे मार्ग राहणार बंद
गर्दी व सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील मार्गांवरील वाहतूक बंद राहील -
-चिंचवड येथील महावीर चौक ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान सेवा रस्त्याने येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी.पर्यायी मार्ग : डी-मार्ट इन-ग्रेडसेपरेटर मार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.
-कासारवाडी येथील नाशिक फाटा चौक ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान सेवा रस्त्यावरून वाहनांना प्रवेशबंदी.पर्यायी मार्ग : डेअरी फार्म ग्रेडसेपरेटर इन तसेच खराळवाडी येथील एच. पी. पेट्रोल पंप समोरून ग्रेडसेपरेटर मार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.
-पिंपरी रेल्वे स्थानक येथील स्व. इंदिरा गांधी पूल ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यानच्या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद.पर्यायी मार्ग : मोरवाडी चौक मार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.
-नेहरूनगर चौक ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान वाहनांना प्रवेश बंद.पर्यायी मार्ग : एच.ए. कॉर्नर बस थांबा ते मासुळकर कॉलनी मार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.
Web Summary : Traffic diversions in Pimpri-Chinchwad on December 6 for Dr. Ambedkar's Mahaparinirvan Din. Key routes near Pimpri Chowk will be closed from noon to 10 PM. Motorists are advised to use alternative routes via D-Mart, Dairy Farm, Morwadi Chowk, and Masulkar Colony to avoid congestion.
Web Summary : डॉ. बाबासाहेब आंबेडकर के महापरिनिर्वाण दिवस पर 6 दिसंबर को पिंपरी-चिंचवड में यातायात परिवर्तन किया गया है। पिंपरी चौक के पास के मुख्य मार्ग दोपहर 12 बजे से रात 10 बजे तक बंद रहेंगे। वाहन चालकों को डी-मार्ट, डेयरी फार्म, मोरवाड़ी चौक और मासुळकर कॉलोनी के माध्यम से वैकल्पिक मार्गों का उपयोग करने की सलाह दी जाती है।