शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातील गैरकारभाराबाबत होणार चौकशी

By विश्वास मोरे | Updated: March 21, 2025 18:52 IST

आमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी : महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने नव्याने निविदा केली 

पिंपरी :  महापालिकेमध्ये सध्या माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये सन २००८ पासून ते २०२५ पर्यंतच्या सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून देखभाल दुरुस्तीचे काम केले जात आहे. मात्र, महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने नव्याने निविदा प्रसिद्ध करून अटोस इंडिया आणि नॅसेंट इन्फो टेक्नॉलॉजीला कंपनीला काम दिले आहे. त्यात महापालिकेच्या गोपनीयतेची काळजी घेतली आहे का? निविदा आणि माहिती तंत्रज्ञान विभागाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी अधिवेशनात केली. त्यानुसार चौकशीचे आदेश दिले आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिकेतील माहिती तंत्रज्ञान विभागात अनागोंदी सुरु आहे. याविषयी अमित गोरखे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. सन २००८ पासून ते २०२५ पर्यंत प्रोबिटी सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड,  टेक ९ सर्व्हिसेस या कंपनी सॉफ्टवेअर व देखभालीचे काम पाहत आहे. प्रोबीटी आणि  टेक ९ सर्व्हिसेसचा खर्च ५ वर्षांकरिता अंदाजे ४ कोटी होत होता. सध्या कार्यरत असणाऱ्या टेक ९ कंपनी आता महापालिकेतील मेंटेनेस सॉफ्टवेअरचे काम पाहत आहे. कंपनीचे वार्षिक बिलिंग ७८,५१,४८२ होत आहे. तर नव्याने महापालिकेने नियुक्त केलेल्या अटोस इंडिया आणि नॅसेंट इन्फो टेक्नॉलॉजी या कंपनीला कोणत्याही प्रकारची गरज नसताना महापालिकेने १२० कोटी रुपयांचे काम दिले आहे. तर या कंपनीने हीच कामे इतर कंपनीला दिले आहे. महत्वाच्या प्रकल्पाचे कामे कोणताही अनुभव नसताना दिलेच कसे? जुनी सिस्टीम १७ वर्ष कार्यरत असताना नविन सिस्टीम कोणत्याही अनुभवाशिवाय पिंपरी- चिंचवड सुरु कशी केली आहे. शासनाने ही नवीन पॉलिसी सुरू केली आहे का? असा प्रश्न आमदार गोरखे यांनी अधिवेशनात उपस्थित केला.  दिरंगाईसाठी अटोस इंडिया, इन्फो टेक्नॉलॉजीला  ९२ लाख रुपये दंडआमदार अमित गोरखे म्हणाले, '४ वर्षात अजूनही नवीन कार्यप्रणाली कार्यान्वित झालेली नसताना अंदाजे ६० कोटी रुपयांचे बिल अटोस इंडिया, इन्फो टेक्नॉलॉजीला आगाऊ का दिले. याचीही चौकशी व्हावी.  नवीन कार्यप्रणालीमधे जिआयएस, एआरपी मॉडेल आणूनसुद्धा संपूर्ण पेपरलेस कारभार होत नाही. महापालिकेमध्ये नवीन प्रणालीच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. महापालिका अभियंत्यांकडून या प्रणालीबाबत नाराजी दर्शविली आहे. मात्र, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचा याच यंत्रणेसाठी हट्ट का? दुसरी बाब म्हणजे याच कंपनीला कामातील दिरंगाई झाल्याने ९२ लाख रुपये दंड केला आहे. करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी सुरू असून यामध्ये अधिकारी व संबंधित कंपनी हे दोषी असून अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी लावून निलंबित करावे आणि या कंपनीचा परवाना रद्द करावा.' त्यावर या प्रकरणाची चौकशी लावण्याचे आश्वासन नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीArrestअटक