शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असलेल्या रस्त्यावर मिक्सर ट्रकचा कहर; तरुणीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:54 IST

चिखली येथे कुदळवाडीतील डायमंड चौकात घडला.

पिंपरी : जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यावर भरधाव आलेल्या मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) सकाळी अकराच्या सुमारास चिखली येथे कुदळवाडीतील डायमंड चौकात घडला.वैष्णवी सुजित दिघे (वय २२) असे मृत तरुणीचे नाव आहे. सीमा बजरंग ढमाले (३०) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत अमोल सखाराम ठोसर (३६, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिक्सर ट्रकचालक बिहारी पांडुरंग जाधव (४१, रा. काले कॉलनी, चऱ्होली) याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मेहुणी वैष्णवी दिघे आणि एक महिला सीमा ढमाले या दोघी दुचाकीवरून जात होत्या. भरधाव आलेल्या मिक्सर ट्रकवरील चालकाने दुचाकीला धडक दिली. डायमंड चौकातील रस्त्यावरील अवजड वाहतुकीला बंदी आहे. असे असतानादेखील मिक्सर चालकाने त्याचे वाहन या रस्त्याने आणले. या अपघातात वैष्णवी आणि सीमा यांच्या अंगावरून मिक्सरचे चाक गेले. त्यात वैष्णवी हिचा मृत्यू झाला, तर सीमा या गंभीर जखमी झाल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mixer Truck Havoc on Banned Road: Young Woman Dies Instantly

Web Summary : A young woman died and another was injured in Chikhli after a speeding mixer truck, illegally on a restricted road, hit their scooter. Police arrested the truck driver. The incident occurred near Diamond Chowk, highlighting the dangers of violating traffic regulations.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड