पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा मद्यधुंद कंटेनर चालकाने बेफाम वाहन चालवत भीषण अपघात घडवला. या हिट-अँड-रन प्रकारात ७ ते ८ चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.अपघात कसा घडला?मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकराच्या सुमारास एक कंटेनर चाकण-हवेली रोडवरून टाटा मोटर परिसराच्या दिशेने जात होता. बोऱ्हाडेवाडी येथील राजमाता जिजाऊ चौक आणि हॉटेल सिल्वर ब्लू परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या कारचे नुकसान झाले. या अपघातात सलग ७-८ वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
Web Summary : A drunk container driver caused a major accident in Pimpri-Chinchwad, damaging multiple vehicles and injuring several people. Police arrested the driver after the hit-and-run incident. Locals demand stricter action.
Web Summary : पिंपरी-चिंचवड में एक नशे में धुत कंटेनर चालक ने कई वाहनों को टक्कर मार दी, जिससे कई लोग घायल हो गए। पुलिस ने हिट-एंड-रन की घटना के बाद ड्राइवर को गिरफ्तार कर लिया। स्थानीय लोगों ने सख्त कार्रवाई की मांग की।