कामशेत येथे लोकलच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 19:44 IST2019-11-07T19:44:01+5:302019-11-07T19:44:59+5:30
पुणे- मुंबई लोहमार्गावर कामशेत शहराच्या हद्दीत एका अज्ञात इसमाला लोणावळा पुणे लोकलची धडक दिली.

कामशेत येथे लोकलच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
कामशेत : पुणे- मुंबई लोहमार्गावर कामशेत शहराच्या हद्दीत एका अज्ञात इसमाला लोणावळा पुणे लोकलची धडक बसुन झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यु झाला.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार ( दि.६) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई लोहमार्गावर कामशेत शहराच्या हद्दीत किलोमीटर नंबर १४४/ ४२ जवळ लोणावळा पुणे लोकल गाडीची धडकेत एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यु झाला. हा इसम अंगाने मजबुत असुन रंगाने काळा सावळा गोल चेहऱ्याचा आहे. डोक्याचे केस पांढरे असुन बारीक मिशी काळी दाढी केलेली आहे. या इसमाची उंची ५ फूट ५ इंच असुन अंगात पांढरा शर्ट काळी फुल पॅन्ट आतमध्ये नेव्ही ब्लू रंगाचा हाप बरमुडा घातला असुन सुमारे ५५ ते ६० वय आहे. याप्रकरणी पुढील तपास रेल्वे पोलीस पोलीस हवलदार संजय तोडमल करीत आहे.