पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महत्त्वाच्या पदांसाठी भाजपने उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. महापौर पदासाठी रवी बाबासाहेब लांडगे तर उपमहापौर पदासाठी विजय उर्फ शीतल गोरख शिंदे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.
आज भरणार अर्ज...
महापौर पदासाठी रवी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शीतल शिंदे हे आज सोमवारी (दि.०२) अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी उमेदवार नाही
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर पार पडणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही. अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर पदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपकडून महापौर पदासाठी ज्याचा अर्ज दाखल होईल. तो बिनविरोध महापौर होणार, हे आता निश्चित झाले आहे.
Web Summary : BJP declared Ravindra Landge as Pimpri-Chinchwad's mayoral candidate, with Sheetal Shinde nominated for Deputy Mayor. Nominations are today. Following Ajit Pawar's death, NCP will not field a candidate, paving way for BJP's unopposed victory.
Web Summary : भाजपा ने रवींद्र लांडगे को पिंपरी-चिंचवड का महापौर उम्मीदवार घोषित किया, शीतल शिंदे उपमहापौर के लिए नामित। नामांकन आज हैं। अजित पवार के निधन के बाद, एनसीपी उम्मीदवार नहीं उतारेगी, जिससे भाजपा की निर्विरोध जीत का मार्ग प्रशस्त हो गया है।