पिंपरी : भाजपने ८४ जागा जिंकून पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात ठेवली आहे. मतांच्या टक्केवारीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनीच वर्चस्व ठेवले आहे. एकूण ९,८९,०२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ४,४७,१०१ मते भाजपला मिळाली असून ४५.२० टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. २०१७ च्या निवडणुकीत हे प्रमाण ३७ टक्के होते. त्या तुलनेत यंदा आठ टक्के वाढ झाली आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ३,६३,३६१ मते मिळाली असून ३६.३७ टक्के मते त्यांच्या गोटात पडली आहेत. २०१७ मध्ये एकत्रित राष्ट्रवादीला २८.५३ टक्के मते मिळाली होती. यंदा राष्ट्रवादीनेही जनाधार लक्षणीयरीत्या वाढवला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना मिळालेल्या मतांवर पक्षफुटीचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला आहे. शिंदेसेनेला ९१,१७६ मते मिळून ९.२१ टक्के मतदारांचा कौल मिळाला, तर उद्धवसेनेस ४१,७६८ मते मिळाली. हे प्रमाण ४.२३ टक्के आहे. २०१७ मध्ये एकत्रित शिवसेनेला १६.५८ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला २७,८०२ मते म्हणजे २.८१ टक्के तर मनसेला १४,७६८ म्हणजे १.४९ टक्के मते मिळाली आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांकडेच बहुसंख्य मते केंद्रित झाल्याचे, तर इतर पक्षांचा प्रभाव मर्यादित राहिल्याचे यंदाच्या महापालिका निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.
पक्षनिहाय मतदान व मिळालेली टक्केवारी
पक्ष | मतदान | टक्केवारी
भाजप | ४,४७,१०१ | ४५.२० टक्केराष्ट्रवादी (अ.प) | ३,६३,३६१ | ३६.३७ टक्के
शिंदेसेना | ९१,१७६ | ९.२१ टक्केउद्धवसेना | ४१,७६८ | ४.२३ टक्के
काँग्रेस | २७,८०२ | २.८१ टक्केमनसे | १४,७६८ | १.४९ टक्के
Web Summary : In PCMC elections, BJP secured 45.20% of votes, retaining power. NCP followed with 36.37%, significantly increasing its share. Shiv Sena factions saw a decline. Other parties had limited impact.
Web Summary : PCMC चुनावों में, भाजपा ने 45.20% वोट हासिल किए, सत्ता बरकरार रखी। राकांपा 36.37% के साथ दूसरे स्थान पर रही, जिसका हिस्सा काफी बढ़ गया। शिवसेना गुटों में गिरावट देखी गई। अन्य दलों का प्रभाव सीमित रहा।