शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election Results 2026:  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेत्यासाठी ‘फिल्डिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:25 IST

- सभागृहाची मुदत संपून चार वर्षे झाल्याने इच्छुकांची गर्दी : पुढील पाच वर्षांसाठी सत्तेची चावी कोणाच्या ताब्यात?; दिग्गज व अनुभवी नगरसेवक सरसावले; पडद्यामागील हालचालींना वेग

पिंपरी : महापालिकेत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवत सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. आता महापालिकेतील सत्तेच्या चाव्या कोण सांभाळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. महापौर, सत्तारूढ पक्षनेता, स्थायी समितीचे अध्यक्ष, उपमहापौर, तसेच विविध विषय समित्या मिळवण्यासाठी अनेक दिग्गज व अनुभवी नगरसेवकांनी ‘फिल्डिंग’ लावली असून, पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.महापालिकेच्या मागील सभागृहाची मुदत १२ मार्च २०२२ रोजी संपली होती. आता भाजपने पुन्हा बहुमत मिळवत पुढील पाच वर्षांसाठी सत्ता हाती घेतली आहे. शहराचा प्रथम नागरिक असलेल्या महापौरपदासाठी अनेक इच्छुक पुढे आले आहेत. महापौरपद अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय स्थायी समिती सभापती, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता आणि विविध विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठीही चढाओढ सुरू आहे. महापालिकेचा अनुभव, पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक कामगिरी यांचा दाखला देत इच्छुक नगरसेवक आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि राज्य नेतृत्वाकडे साकडे घालत आहेत. भेटीगाठींचा सिलसिला वाढला असून, शिफारशींसाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थायी समितीसाठी आग्रह

भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे सलग तिसऱ्यांदा निवडून आले असून, त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक ८५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सत्तारूढ पक्षनेते किंवा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले माजी गटनेते राहुल कलाटे हेही तयारी करीत आहेत. माजी महापौर राहुल जाधव व माजी महापौर नितीन काळजे, सलग तीनवेळा निवडून आलेले शीतल शिंदे हेही त्या पदासाठी दावेदार मानले जात आहेत. सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगेही आग्रह धरू शकतात. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अमित गावडे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, शैलजा मोरे व हिराबाई घुले, हर्षल ढोरे, संदीप कस्पटे, आरती चोंधे, माजी महापौर शकुंतला धराडे, शशिकांत कदम, नवनाथ जगताप, नम्रता लोंढे, सोनाली गव्हाणे इच्छुक आहेत.स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणी

महापौरपद राखीव झाल्यास भाजपच्या ‘एससी’ गटातील नगरसेवकांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. वर्षभरासाठी एक-एक नगरसेवकाला संधी देण्याचा पर्यायही चर्चेत आहे. याचबरोबर स्वीकृत नगरसेवकांच्या पाच जागांसाठीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पराभूत दिग्गजांना त्या माध्यमातून संधी देण्याचा पक्षाचा विचार असू शकतो. प्रशासकीय राजवट लवकरच संपुष्टात

महापौर निवडीनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वसाधारण सभा बोलावून महापौर व उपमहापौरांची निवड होईल. त्यानंतर पक्षनेते, विरोधी पक्षनेते, तसेच विषय समित्यांची रचना केली जाईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर महापालिकेतील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे, याबाबत गुरुवारी (दि.२२) राज्य शासनाकडून सोडत काढण्यात येणार आहे. त्याबाबत पत्र आल्यानंतर विभागीय आयुक्तांची परवानगी घेऊन पहिली सर्वसाधारण सभा बोलावली जाईल. त्यांच्या अध्यक्षतेखाली महापौरपदाची निवड केली जाईल.  - मुकेश कोळप, नगरसचिव

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad: Intense lobbying for key positions in the Municipal Corporation

Web Summary : BJP secures power in Pimpri-Chinchwad, sparking competition for Mayor, Deputy Mayor, and committee head roles. Numerous councilors are vying for positions, engaging in intense lobbying and seeking support from party leaders. The administrative rule will end after the mayoral election.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६