ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत यंदा शहरात अनेक प्रभागांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) असा थेट आणि निर्णायक सामना दिसत आहे. महायुतीतील या दोन पक्षांच्या संघर्षामुळे निवडणूक रंगतदार झाली असून, कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या १२८ जागांपैकी दोन बिनविरोध झाल्याने १२६ जागांसाठी भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, मनसे, आप, इतर पक्ष व अपक्ष रिंगणात आहेत. मात्र, बहुतांश प्रमुख प्रभागांमध्ये खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार)मध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील वेळी महापालिकेवर भाजपने सत्ता मिळवली असली, तरी शहरातील कथित भ्रष्टाचार, पाणीटंचाई, रस्त्यांची अवस्था, कचरा व्यवस्थापन, निविदांमधील वाद असे मुद्दे राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट प्रचारात पुढे आणले आहेत. दुसरीकडे, भाजपने विकासकामे, पायाभूत सुविधा, केंद्र-राज्य समन्वय आणि स्थिर प्रशासन हे मुद्दे पुढे करत राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. प्रचारातील सूर आरोप-प्रत्यारोपांचा झाला असून, वातावरण चांगलेच तापले आहे.
काहींसाठी वैयक्तिक प्रतिष्ठेची लढत
विशेष म्हणजे अनेक प्रभागांमध्ये घराणेशाही आणि नातेसंबंधांतील राजकारण हादेखील चर्चेचा विषय आहे. भाऊ–भाऊ, चुलत भावंडे, भावकी, एकाच आडनावाचे उमेदवार आमने-सामने आल्याने ही निवडणूक केवळ पक्षीय न राहता वैयक्तिक प्रतिष्ठेचीही बनली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभागनिहाय ‘बिग फाईट’ (कंसात पक्ष)
१ ड : यश साने (राष्ट्रवादी अ.प.) × गणेश मळेकर (भाजप)२ क : राहुल जाधव (भाजप) × विशाल आहेर (राष्ट्रवादी अ.प.)
५ अ : भीमाबाई फुगे (राष्ट्रवादी अ.प.) × अनुराधा गोफणे (भाजप)५ ड : जालिंदर शिंदे (भाजप) × राहुल गवळी (राष्ट्रवादी अ.प.)
८ अ : सीमा सावळे (राष्ट्रवादी अ.प.) × डॉ. सुहास कांबळे (भाजप)८ ड : विलास मडिगेरी (भाजप) × तुषार सहाणे (राष्ट्रवादी अ.प.)
९ अ : सिद्धार्थ बनसोडे (राष्ट्रवादी अ.प.) × कमलेश वाळके (भाजप)९ ड : राहुल भोसले (राष्ट्रवादी अ.प.) × सद्गुरू कदम (भाजप)
१० अ : अनुराधा गोरखे (भाजप) × नीलिमा पवार (राष्ट्रवादी अ.प.)१० क : कुशाग्र कदम (भाजप) × संदीप चव्हाण (राष्ट्रवादी अ.प.)
१२ ड : पंकज भालेकर (राष्ट्रवादी अ.प.) × शांताराम भालेकर (भाजप)१३ क : सुलभा उबाळे (शिंदेसेना) × अश्विनी चिखले (मनसे) × मनीषा कुलकर्णी (भाजप)
१४ ब : वैशाली काळभोर (राष्ट्रवादी अ.प.) × मीनल यादव (शिंदेसेना)१४ ड : प्रमोद कुटे (राष्ट्रवादी अ.प.) × प्रसाद शेट्टी (भाजप)
१५ अ : राजू मिसाळ (भाजप) × धनंजय काळभोर (राष्ट्रवादी अ.प.)१६ ड : मोरेश्वर भोंडवे (राष्ट्रवादी अ.प.) × दीपक भोंडवे (भाजप)
१७ ब : नामदेव ढाके (भाजप) × भाऊसाहेब भोईर (राष्ट्रवादी अ.प.)१७ ड : शेखर चिंचवडे (राष्ट्रवादी अ.प.) × सचिन चिंचवडे (भाजप)
१८ अ : अपर्णा डोके (भाजप) × पूजा आगज्ञान (राष्ट्रवादी अ.प.)१८ क : मोरेश्वर शेडगे (भाजप) × अनंत कोऱ्हाळे (राष्ट्रवादी)
२० अ : सुलक्षणा धर (राष्ट्रवादी श.प.) × जितेंद्र ननावरे (राष्ट्रवादी अ.प.)२१ ब : संदीप वाघेरे (राष्ट्रवादी अ.प.) × गणेश ढाकणे (भाजप)
२१ ड : डब्बू आसवानी (राष्ट्रवादी अ.प.) × नरेश पंजाबी (भाजप)२२ क : विनोद नढे (भाजप) × मच्छिंद्र तापकीर (राष्ट्रवादी अ.प.)
२४ अ : विश्वजित बारणे (शिंदेसेना) × सिद्धेश्वर बारणे (भाजप) × संतोष बारणे (राष्ट्रवादी अ.प.)२५ क : श्रुती वाकडकर (भाजप) × चित्रा पवार (राष्ट्रवादी अ.प.)
२५ ड : राहुल कलाटे (भाजप) × मयूर कलाटे (राष्ट्रवादी अ.प.)३० अ : राजू बनसोडे (राष्ट्रवादी अ.प.) × चंद्रकांता सोनकांबळे (आरपीआय–भाजप)
३० ड : रोहित काटे (राष्ट्रवादी अ.प.) × संजय काटे (भाजप)३१ ड : नवनाथ जगताप (भाजप) × अरुण पवार (राष्ट्रवादी अ.प.)
३२ ड : प्रशांत शितोळे (भाजप) × अतुल शितोळे (राष्ट्रवादी अ.प.)
Web Summary : Pimpri-Chinchwad faces a BJP-NCP showdown in 2026 elections across 30 wards. Key issues like corruption and infrastructure dominate campaigns. Many battles are personal, family rivalries intensify the political fight.
Web Summary : पिंपरी-चिंचवड में 2026 के चुनावों में 30 वार्डों में भाजपा-एनसीपी का मुकाबला है। भ्रष्टाचार और बुनियादी ढांचे जैसे मुद्दे हावी हैं। कई लड़ाइयाँ व्यक्तिगत हैं, पारिवारिक प्रतिद्वंद्विता से राजनीतिक लड़ाई तीव्र है।