शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

महापालिका शाळांची गुणवत्ता ढासळली ; दहावीच्या निकालात पिछाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 3:54 PM

गतवर्षी महापालिका शाळांचा दहावीचा निकाल ८५.०१ टक्के, यावर्षी हा निकाल ६६.६४ टक्के लागला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेतील लाखांचे बक्षीस मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पंधराने घटली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांवर कोट्यवधींचा खर्च करूनही गुणवंतांची संख्या कमी होत आहे. गतवर्षी महापालिका शाळांचादहावीचा निकाल ८५.०१ टक्के लागला होता. यावर्षी हा निकाल ६६.६४ टक्के लागला आहे. २०.६४ टक्क्यांंनी घटला आहे. महापालिकेतील लाखांचे बक्षीस मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पंधराने घटली आहे. केवळ तीनच विद्यार्थी लखपती झाले. महापालिकेने ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एक लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. यावर्षीच्या निकालानुसार तीनच विद्यार्थीं लखपतीच्या बक्षिसास पात्र ठरले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अठरा शाळा आहेत. यापैकी पिंपळे  सौदागर येथील माध्यमिक विऱ्यां द्यालयातील दोन, थेरगाव माध्यमिक विद्यालयातील एक अशा एकूण तीन विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या पुढे गुण प्राप्त केले आहेत. यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. ८० टक्क्यांंहून अधिक  गुण मिळविलेल्यांमध्ये पिंपळे सौदागर येथील माध्यमिक विद्यालयातील तेरा, थेरगावातील पाच, रूपीनगर येथील तीन, निगडीत दोन, संत तुकारामनगर येथील एक, क्रीडा प्रबोधिनी दोन, लांडेवाडी, भोसरी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपरी, पिंपळे गुरव, वाकड, केशवनगर, आकुर्डी, काळभोरनगरातील प्रत्येकी एका अशा एकूण ३४ विद्यार्थ्यांनी ८० ते ८५ टक्के गुण मिळविले आहेत. त्यांना पंचवीस हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.तर, ८५ टक्क्यांंहून अधिक गुण मिळविणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. पिंपळे सौदागरमधील दोन, भोसरी आणि केशवनगर माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी पाच, पिंपळे सौदागर, क्रीडा प्रबोधिनी, थेरगाव, आकुर्डी विद्यालयातील प्रत्येकी दोन अशा एकूण २१ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एका विद्याथ्यार्ला ८५ ते ९० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.गुणवंतांसाठी बक्षीस योजना महापालिकेतर्फे  ८० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार केला जातो. ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्याथ्यार्ला एक लाख, ८५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्यास पन्नास हजार रुपये आणि ऐंशी टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाSSC Resultदहावीचा निकाल