PCMC: ऑनलाईन कर भरण्यास ५५ टक्के नारिकांचे प्राधान्य; वाकडमधून सर्वाधिक मिळकतकर

By विश्वास मोरे | Published: April 2, 2024 04:17 PM2024-04-02T16:17:10+5:302024-04-02T16:18:09+5:30

सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त ८ हजार ५२७ मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे....

PCMC: 55 percent women prefer online tax payment; Highest Income Tax from Wakad | PCMC: ऑनलाईन कर भरण्यास ५५ टक्के नारिकांचे प्राधान्य; वाकडमधून सर्वाधिक मिळकतकर

PCMC: ऑनलाईन कर भरण्यास ५५ टक्के नारिकांचे प्राधान्य; वाकडमधून सर्वाधिक मिळकतकर

पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने आर्थिक वर्षात ९७७ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच ८७ टक्के मिळकत कर वसूल करण्यात यश आले आहे. वाकड झोनमधून १५४ काेटींचा उच्चांकी कर वसूल झाली आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त ८ हजार ५२७ मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे.

ऑनलाईन कर भरण्यास ५५ टक्के नारिकांचे प्राधान्य मिळकत कर हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  प्रमुख स्त्रोत आहे. महापालिका हद्दीत ६ लाख २५ हजार मालमत्ता आहेत. यापैकी ५ लाख ११ हजार १५४ मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी ८१६ कोटींचा कर वसूल केला होता. यंदा १६१ कोटींचा अधिक कर वसूल केला आहे. 

पहिल्यांदाच ९७७ काेटीं उत्पन्न 
दोन हजारांपेक्षा जास्त मालमत्ता सील.
८७  टक्के चालू कर वसूल 
४९ टक्के थकीत कर वसूल 

वाकडमधून मिळाले १५४ काेटी
महापालिकेचे कर संकलनासाठी १७ झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक म्हणजे ६८ हजार मालमत्ता धारकांनी १५४ काेटी ५८ लाख रुपयांचा कर जमा केला आहे. त्याखालोखाल सांगवीत ५१ हजार ७१८, चिखलीत ४५ हजार ६३४, थेरगावमध्ये ४५ हजार ४३४, चिंचवडमध्ये ४३ हजार २८६, माेशीत ३४ हजार ९८०, भाेसरीत ३३ हजार ८६७ मालमत्ता धारकांनी कराचा भरणा झाला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये ८ हजार ५२७ मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे. 

ऑनलाईन - ५५४ कोटी ५९ लाख  
रोख    - १३७ कोटी ४९ लाख 
धनादेशाद्वारे - १६६ काेटी ५७ लाख
ईडीसी - १३ काेटी ८१ लाख 
आरटीजीएस -४४ कोटी ७६ लाख 
डीडी - ८ काेटी ५७ लाख 
विविध ॲप - १० कोटी २ लाख
एनएफटी - ६ काेटी ९३  लाख

मिळकत कराच्या एक हजार कोटींच्या लक्ष्याच्या जवळ पोहोचलो आहे. याचे समाधान आहे. कराचा विनियोग हे शहर उत्तम शाश्वत विकासाचे मॉडेल होण्यासाठीच वापरला जाईल. पुढील वर्षात सर्वेक्षणातील सर्व नवीन मालमत्तांची कर आकारणी करणे, करविषयक सर्व अभिलेखांचे स्कॅनिंग, डीजिटायझेशन करून  हा विभाग संपूर्णतः लोकाभिमुख होईल याचा प्रयत्न राहील. 

- शेखर सिंह, आयुक्त

कर संकलन विभागाने नियोजन केले. त्यामुळे हा टप्पा गाठू शकलेलो आहोत. मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेली जप्ती मोहीम आणि यंदा जप्ती केलेल्या मालमत्तांची प्रथमच राबवलेली लिलाव प्रक्रिया याचाही कर संकलनाला उपयोग झाला आहे. 
- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त

 

Web Title: PCMC: 55 percent women prefer online tax payment; Highest Income Tax from Wakad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.